तीन तासांच्‍या अंतराने कोलवडमधून तरुणी, विवाहित तरुण गायब!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोलवड (ता. बुलडाणा) येथून तीन तासांच्या अंतराने 18 वर्षीय तरुणी आणि 25 वर्षीय विवाहिता तरुण गायब झाले आहेत. मुलगी हरवल्याची तक्रार वडिलांनी तर पती हरवल्याची तक्रार पत्नीने बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. कु. कोमल गजानन गायकवाड 12 जून रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास झोपेतून उठून घरात कोणाला न सांगता बाहेर …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोलवड (ता. बुलडाणा) येथून तीन तासांच्‍या अंतराने 18 वर्षीय तरुणी आणि 25 वर्षीय विवाहिता तरुण गायब झाले आहेत. मुलगी हरवल्याची तक्रार वडिलांनी तर पती हरवल्याची तक्रार पत्‍नीने बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

कु. कोमल गजानन गायकवाड 12 जून रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास झोपेतून उठून घरात कोणाला न सांगता बाहेर निघून गेली. नंतर परत आलीच नाही. त्यामुळे तिचे वडील गजानन दिनकर गायकवाड (42) यांनी तिचा सर्व मैत्रिणी व नातेवाइकांकडे शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. त्यामुळे वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. रंग गोरा, सडपातळ बांधा, उंची 5 फूट, डाव्या हातावर जन्मखून, अंगात पंजाबी ड्रेस (पिवळा सलवार व लाल कुडता), पायात पांढरी सँडल अशा वर्णनाची मुलगी कुठे आढळल्यास बुलडाणा शहर पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेचा तपास महिला पोलीस कॉन्‍स्टेबल कोकिला तोमर करत आहेत.

25 वर्षीय विवाहित तरुण गायब
राहुल तानाजी निकाळजे (25) हा 11 जून रोजी रात्री 11 च्‍या सुमारास घरातून निघून गेला. रात्रीच्या सुमारास सर्व झोपले असताना पत्नी सौ. पूर्णता (22) हिला मी गावातून येतो असे सांगून राहुल निघून गेला. तो अद्याप परतला नाही. गावातील मित्र व नातेवाइकांकडे शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. त्‍याने सोबत (एमएच 14 -3949) क्रमाकांचा स्‍कूटीनेली आहे. आज त्याच्‍या पत्नीने शहर पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. रंग सावळा, उंची 5 फूट, नेव्ही ब्लू टीशर्ट, नाईट पॅन्ट निळी, मोबाइल सोबत नेला आहे अशा वर्णनाचा हा तरुण कुठे आढळून आल्यास शहर पोलीस ठाण्याला कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याही घटनेचा तपास महिला पोलीस कॉन्‍स्टेबल कोकिला तोमर करत आहेत.

काल खामगावातून तरुणी, मोताळ्यातून तरुण गायब
काल, 13 जूनला खामगाव शहरातील घाटपुरी येथील 19 वर्षीय गिता लालसिंह राठोड ही तरुणी कुणाला काही न सांगता घरातून निघून गेली आहे. ती हरवल्याची तक्रार शिवाजीनगर पोलिसांत करण्यात आली आहे. मोताळा शहरातून शेख वकील शेख शेरीफ हा 20 वर्षीय तरुण घरातून कुणाला काही न सांगता निघून गेल्याची तक्रार त्‍याच्या घरच्‍यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात केली आहे.