तीन दिवसांत पाच विवाहिता बेपत्ता!; कंडारीतून दाम्‍पत्‍य गायब!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून गेल्या तीन दिवसांत पाच विवाहिता बेपत्ता झाल्याच्या तक्रारी त्या त्या पोलीस ठाण्यांत करण्यात आल्या आहेत. आज, ३० जुलैला खामगावच्या शिक्षक कॉलनीतील सौ. सोनाली प्रदीप पोळके (१९) ही विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार खामगाव शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शेगाव येथील शिवाजीनगर सरकारी फैल भागातील ३५ वर्षीय सौ. शोभा गणेश …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून गेल्या तीन दिवसांत पाच विवाहिता बेपत्ता झाल्याच्या तक्रारी त्‍या त्‍या पोलीस ठाण्यांत करण्यात आल्‍या आहेत. आज, ३० जुलैला खामगावच्‍या शिक्षक कॉलनीतील सौ. सोनाली प्रदीप पोळके (१९) ही विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार खामगाव शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शेगाव येथील शिवाजीनगर सरकारी फैल भागातील ३५ वर्षीय सौ. शोभा गणेश गुप्‍त ही विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार शेगाव शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. २८ जुलैला नांदुरा येथील २३ वर्षीय सौ. प्रिया सुनील राजपूत ही विवाहिता राहत्‍या घरातून निघून गेल्याची तक्रार नांदुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. लोणार तालुक्‍यातील येवती येथील २० वर्षीय सौ. वर्षा उर्फ सोनू शिवाजी जाधव ही विवाहिता गायब झाल्याची तक्रार लोणार पोलिसांत करण्यात आली आहे. मेहकर तालुक्‍यातील बदनापूर येथील परमेश्वर ज्ञानेश्वर रणबावरे हा २२ वर्षीय युवकही बेपत्ता झाल्‍याची तक्रार मेहकर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
दाम्‍पत्‍य बेपत्ता
नांदुरा तालुक्‍यातील कंडारी येथील गणेश रमेश हेलोडे (३०) आणि त्‍याची पत्‍नी सौ. लता गणेश हेलोडे (२५) बेपत्ता झाल्याची तक्रार बोराखेडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.