तीन पुरुषांसह महिलेचा कोरोनामुळे मृत्‍यू; 180 नवे रुग्‍ण, 289 रुग्‍णांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 4 जूनला कोरोनाने चार बळी घेतले असून, यात उपचारादरम्यान मलकापूरमधील रामवाडीतील 44 वर्षीय पुरुष, अनिकेत रोड खामगाव येथील 44 वर्षीय पुरुष, उटी (ता. मेहकर) येथील 70 वर्षीय पुरुष, शेंदुर्जन (ता. सिंदखेड राजा) येथील 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 180 नव्या रुग्णांची भर पडली असून, 289 रुग्ण …
 
तीन पुरुषांसह महिलेचा कोरोनामुळे मृत्‍यू; 180 नवे रुग्‍ण, 289 रुग्‍णांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 4 जूनला कोरोनाने चार बळी घेतले असून, यात उपचारादरम्यान मलकापूरमधील रामवाडीतील 44 वर्षीय पुरुष, अनिकेत रोड खामगाव येथील 44 वर्षीय पुरुष, उटी (ता. मेहकर) येथील 70 वर्षीय पुरुष, शेंदुर्जन (ता. सिंदखेड राजा) येथील 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 180 नव्‍या रुग्‍णांची भर पडली असून, 289 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4295 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4115 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 180 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 123 व रॅपिड टेस्टमधील 57 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 972 तर रॅपिड टेस्टमधील 3143 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 15, बुलडाणा तालुका : येळगाव 1, दहीद बुद्रूक 1, रायपूर 6, खुपगाव 1, गुम्मी 1, अजिसपूर 1, तराडखेड 1, सावळा 1, अटकळ 2, हतेडी 1, पळशी 1, धामणगाव 1, टाकळी 1, रुईखेड 2, मोताळा तालुका : सिंदखेड 1, वारुळी 1, वरूड 1, अंत्री 1, धामणगाव बढे 1, कोऱ्हाळा बाजार 1, शेलापूर 1, तालखेड 1, सावरगाव 1, खामगाव शहर : 8, खामगाव तालुका : लाखनवाडा 1, नांद्रा 1, नागापूर 4, टेंभुर्ण 1, गोंधनापूर 1, पारखेड 1, लांजूड 2, चिखली शहर : 5, चिखली तालुका : उंद्री 1, वळती 1, खैरव 1, देऊळगाव राजा शहर : 12, देऊळगाव राजा तालुका : सिनगाव जहाँगीर 1, गव्हाण 3, जांभोरा 2, जुंबडा 2, टाकरखेड भा. 2, पिंपळगाव 3, मांडवा 1, निमखेड 1, भिवगन 1, सिंदखेड राजा शहर : 2, सिंदखेड राजा तालुका : पळसखेड 1, भोसा 1, शेलगाव राऊत 2, मेहकर शहर : 2, मेहकर तालुका : उटी 1, अकोला ठाकरे 1, जानेफळ 2, नागझरी 2, जळगाव जामोद तालुका : पळशी वैद्य 3, पळशी सुपो 1, खांडवी 1, आसलगाव 2, नांदुरा शहर : 2, नांदुरा तालुका : वळती 1, अंबोडा 1, जीगाव 1, वसाडी 1, दादगाव 3, नायगाव 1, लोणार शहर : 1, लोणार तालुका : देऊळगाव कोळ 1, किन्ही 1, चिखला 1, दाभा 7, येवती 1, मुटखेड 1, खंडाळा 2, भुमराळा 3, परजिल्हा बाळापूर 1, वडोदा (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) 2 अशाप्रकारे जिल्ह्यात 180 रुग्ण आढळले आहेत.

1202 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आज 289 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 496774 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 83584 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 581 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 85412 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या 1202 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 626 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.