तीन बळी घेत कडक लॉकडाऊनची सुरुवात!; जिल्ह्यात 734 पॉझिटिव्ह

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी)ः गत् 24 तासांत जिल्ह्यात 734 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बुलडाणा व चिखली तालुक्याने दीड शतकाच्या पल्याड मारलेली मजल आणि 6 तालुक्यांत कायम असलेला कोविडचा धुमाकूळ हे ठळक वैशिष्ट्य ठरावे.20 टक्क्यांच्या घरात गेलेला पॉझिटिव्ही रेट (बाधित होण्याचा दर) हे आजच्या अहवालाचे धक्कादायक वैशिष्ट्य किंबहुना धोक्याची घंटी ठरावी. आजवरचा (प्रगतीपथावरील ) हाच दर 14.44 …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी)ः गत्‌ 24 तासांत जिल्ह्यात 734 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बुलडाणा व चिखली तालुक्याने दीड शतकाच्या पल्याड मारलेली मजल आणि 6 तालुक्यांत कायम असलेला कोविडचा धुमाकूळ हे ठळक वैशिष्ट्य ठरावे.
20 टक्‍क्‍यांच्‍या घरात गेलेला पॉझिटिव्ही रेट (बाधित होण्याचा दर) हे आजच्या अहवालाचे धक्कादायक वैशिष्ट्य किंबहुना धोक्याची घंटी ठरावी. आजवरचा (प्रगतीपथावरील ) हाच दर 14.44 टक्के असताना गत्‌ 24 तासांतील दर 19.45 टक्के इतका आहे. तसा तो 10 टक्‍क्‍यांवर असणे अपेक्षित व आवश्यक आहे. मात्र त्याने 20 टक्‍क्‍यांच्‍या घरात पोहोचणे गंभीर बाब ठरावी. आघाडीवरील बुलडाणा तालुक्यात 151 रुग्ण निघणे आता धक्कादायक बाब उरली नाहीये! पण काही दिवसांपासून नियंत्रणात व दुहेरी आकड्यात असणाऱ्या चिखली तालुक्यात कोरोनाने 157 पॉझिटिव्ह सहित घेतलेली उसळी धोक्याची घंटी मानली जात आहे. यामुळे तालुक्यातून कोरोना कमी झाला असा (गैर) समज करून घेणे चुकीचे ठरणार आहे. दुसरीकडे या 2 सह जिल्ह्यातील 6 तालुक्यांतील कोवीडकुमारचा धुमाकूळ कायम असणे आरोग्य यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरत आहे. नांदुरा 62, खामगाव 53, लोणार 58, सिंदखेडराजा 55 या तालुक्यातील आकडेच बोलके आहेत.
7 तालुके नियंत्रणात?
दरम्यान, या तुलनेत अन्य 7 तालुके आटोक्यात आहेत असे वरकरणी चित्र आहे. मोताळा 39, मेहकर 37, जळगाव 34, मलकापूर 30, देऊळगाव राजा 29, शेगाव 24 या तालुक्यांतील किमान आजचे चित्र तरी दिलासा देणारे आहे. मात्र 24 तासांत 3 जणांचा झालेला मृत्यू हा दिलासा पोकळ ठरवितो. हे दुर्दैवी जीव बुलडाणा येथील महिला रुग्‍णालयात उपचारादरम्यान दगावले.