तीन महिलांसह एका पुरुषाचा कोरोनाने मृत्यू; नव्या 74 बाधितांची भर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तीन महिलांसह एका पुरुषाचा कोरोनाने आज, 9 जूनला मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नव्या 74 बाधितांची भर पडली असून, दिवसभरात 138 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4078 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4004 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 74 …
 
तीन महिलांसह एका पुरुषाचा कोरोनाने मृत्यू; नव्या 74 बाधितांची भर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तीन महिलांसह एका पुरुषाचा कोरोनाने आज, 9 जूनला मृत्‍यू झाल्याचे समोर आले आहे. नव्या 74 बाधितांची भर पडली असून, दिवसभरात 138 रुग्‍णांना रुग्‍णालयातून सुटी देण्यात आली आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4078 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4004 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 74 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 44 व रॅपीड टेस्टमधील 30 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 211 तर रॅपिड टेस्टमधील 3793 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 5, बुलडाणा तालुका : मोहज 1, पाडळी 1, रायपूर 1, दहीद 1, अजिसपूर 1, रूईखेड 1, मलकापूर शहर : 1, मलकापूर तालुका : सिराढोण 1, सिंदखेड राजा शहर : 4, सिंदखेड राजा तालुका : निमगाव 1, सुलजगाव 1, वर्दडी 1, सावरगाव 1, दुसरबीड 1, आडगाव राजा 1, देऊळगाव राजा शहर : 6, देऊळगाव राजा तालुका : देऊळगाव मही 5, पिंपळगाव 1, खल्याळ गव्हाण 1, सावखेड तेजन 1, जुंबडा 1, जांभोरा 2, नागणगाव 3, सिनगाव जहागीर 2, पिंपळगाव चि. 2, सावखेड नागरे 1, पिंप्री आंधळे 1, मेंडगाव 2, सातेगांव 1, सुरा 1, खैरव 1, चिखली शहर : 5, चिखली तालुका : भोरसा भोरसी 1, सावरखेड डुकरे 1, गोद्री 1, संग्रामपूर तालुका : शेवगा 3, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 1, जळगाव जामोद तालुका : पळशी सुपो 1, नांदुरा तालुका : दादगाव 1, लोणार तालुका : पिंप्री 1, शारा 1, जांभूळ 1, सरस्वती 1, धायफळ 1, सावरगाव 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 74 रुग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान माटरगाव (ता. शेगाव) येथील 71 वर्षीय महिला, केळवद (ता. चिखली) येथील 80 वर्षीय महिला, मोहाडी (ता. सिंदखेड राजा) येथील 85 वर्षीय महिला व शिवशंकरनगर, बुलडाणा येथील 40 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

138 रुग्‍णांनी केली कोरोनावर मात
आज 138 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 514405 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 84380 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1399 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 514405 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 85783 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्‍णालयात 764 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 639 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.