“ती’ आली म्‍हणे नवरा हरवला, “तो’ आला म्‍हणे बायको हरवली… शेगावचे पोलीसही हैराण

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव शहर पोलीस सध्या वाढत्या बेपत्ताच्या तक्रारींनी हैराण आहेत. काल, ३० ऑगस्टला त्यांच्याकडे एका विवाहितेने पती हरवल्याची तक्रार केली. याच दिवशी पत्नी हरवल्याचीही तक्रार घेऊन एक व्यक्ती आला. त्यामुळे आता दोघांना शोधणे पोलिसांसमोर आव्हानच बनले आहे. किनगाव राजा पोलीस ठाण्यातही दोन विवाहिता बेपत्ता झाल्याच्या नोंदी झाल्या आहेत. शेगावच्या रेणुकानगरातील रहिवासी …
 
“ती’ आली म्‍हणे नवरा हरवला, “तो’ आला म्‍हणे बायको हरवली… शेगावचे पोलीसही हैराण

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव शहर पोलीस सध्या वाढत्‍या बेपत्ताच्‍या तक्रारींनी हैराण आहेत. काल, ३० ऑगस्‍टला त्‍यांच्याकडे एका विवाहितेने पती हरवल्याची तक्रार केली. याच दिवशी पत्‍नी हरवल्याचीही तक्रार घेऊन एक व्‍यक्‍ती आला. त्‍यामुळे आता दोघांना शोधणे पोलिसांसमोर आव्हानच बनले आहे. किनगाव राजा पोलीस ठाण्यातही दोन विवाहिता बेपत्ता झाल्याच्या नोंदी झाल्या आहेत.

शेगावच्‍या रेणुकानगरातील रहिवासी दिलीप भीमराव आगाशे (५४) हे २५ ऑगस्ट रोजी सकाळी घरून निघून गेले. सायंकाळ होऊनही ते घरी परतले नाही. त्यांचा शोध घेऊनही ते कुठेच मिळून न आल्याने त्यांची पत्नी प्रमिला आगाशे यांनी काल नवरा हरविल्याची तक्रार शेगाव शहर पोलीस ठाण्यात दिली.

दुसऱ्या घटनेत धनोकरनगर येथील आशाबाई नामदेव टावरे (५५) या २९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता घराबाहेर पडल्या. घरी कुणाला काहीही सांगितले नाही. त्या घरी परतल्या नसल्याने शोधाशोध सुरू झाली. मात्र तरीही न सापडल्याने त्यांचे पती नामदेव विश्वनाथ टावरे यांनी काल बायको हरविल्याची तक्रार दिली.

किनगाव राजा पोलीस ठाण्यात दोघींची नोंद
किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन विवाहिता बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. काल चंदन विजय वाघमारे (२५) ही हिवरखेड येथून तर आज ३१ऑगस्ट रोजी सौ. पल्लवी सदाशिव नागरे (१९) ही हिवरखेड पूर्णा येथून बेपत्ता झाल्याची नोंद आहे.