“तुझ्या पोटातील बाळ माझे नाही’ म्‍हणत विवाहितेचा मारहाण!

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः तुझ्या पोटातील बाळ माझे नाही, असे म्हणत साखरखेर्डा येथील विवाहितेला पतीने मारहाण केली. विवाहितेने पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अंगणवाडीत पोषण आहार योजनेत नाव नोंदविण्यासाठी विवाहिता गेली होती. त्यावेळी तिचा तिथे आला. तिला म्हणाला, की तू घरी चल. नाव नोंदवायचे नाही. कारण तुझ्या …
 
“तुझ्या पोटातील बाळ माझे नाही’ म्‍हणत विवाहितेचा मारहाण!

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः तुझ्या पोटातील बाळ माझे नाही, असे म्‍हणत साखरखेर्डा येथील विवाहितेला पतीने मारहाण केली. विवाहितेने पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्‍यावरून पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

अंगणवाडीत पोषण आहार योजनेत नाव नोंदविण्यासाठी विवाहिता गेली होती. त्‍यावेळी तिचा तिथे आला. तिला म्‍हणाला, की तू घरी चल. नाव नोंदवायचे नाही. कारण तुझ्या पोटातील बाळ माझे नाही, असे म्हणून तिला अश्लील शिविगाळ केली. चापटाबुक्‍क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे विवाहितेने तक्रारीत म्‍हटले आहे.