तुमची तर अशी फसवणूक झाली नाही ना? बुलडाण्याच्या व्यक्तीला साडे अकरा लाखांनी गंडवले; पैसे गुंंतवल्यास नफा-प्लॉटचे आमिष

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आमच्या कंपनीत पैसे गुंतवा, महिन्याला हजारो रुपये नफा मिळवा. स्वस्त प्लॉट मिळवा, असे आमिष दाखवून बुलडाण्याच्या एका पैसे गुंतवणार्याला साडेअकरा लाख रुपयांनी गंडा घाल्याचा प्रकार समोर आला आहे.रिदास इंडिया प्रॉपर्टीज कंपनी बंगळुरूच्या औरंगाबाद शाखेने या कंपनीत 50 हजार रुपये गुंतवणूक केल्यास प्रत्येक महिन्याला 2650 ते 3125 रुपये नफ्यापोटी परतावा मिळण्याचे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आमच्या कंपनीत पैसे गुंतवा, महिन्याला हजारो रुपये नफा मिळवा. स्वस्त प्लॉट मिळवा, असे आमिष दाखवून बुलडाण्याच्या एका पैसे गुंतवणार्‍याला साडेअकरा लाख रुपयांनी गंडा घाल्याचा प्रकार समोर आला आहे.
रिदास इंडिया प्रॉपर्टीज कंपनी बंगळुरूच्या औरंगाबाद शाखेने या कंपनीत 50 हजार रुपये गुंतवणूक केल्यास प्रत्येक महिन्याला 2650 ते 3125 रुपये नफ्यापोटी परतावा मिळण्याचे आमिष दाखवले होते. मूळ रक्कम परत पाहिजे असल्यास 40 दिवसांत परत मिळेल. तसेच औरंगाबाद जिल्ह्यात रोडटच प्लॉट पाहिजे असल्यास स्वस्त दरात मिळेल, अशी जाहिरात केली होती. बुलडाणा येथील मो. साजिद अबुल हसन देशमुख (34, रा. इकबाल चौक, बुलडाणा) यांनी व त्यांच्या नातेवाइकांनी या जाहिरातीवरून साडेअकरा लाख रुपये रिदास इंडिया प्रॉपर्टीज या कंपनीत गुंतवले होते. कंपनीने सुरुवातीचे काही महिने परतावा दिला. मात्र नंतर जाहिरातीप्रमाणे परतावा दिला नाही आणि मूळ रक्कम सुद्धा परत केली नाही. आपण फसवले गेल्याची जाणीव होताच मो. साजिद अबुल हसन देशमुख यांनी बुलडाणा शहर पोलिसांत 27 ऑक्टोबर 2020 रोजी दिली होती. या प्रकरणाची चौकशी करून कंपनीचा डायरेक्टर अयुब हुसेन व अनिस आयमन (रा. बंगळुरू) यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक कैलास राहणे, पोहेकाँ राजेंद्रसिंह मोरे, अविनाश जाधव, रामेश्‍वर मुंडे करत आहेत. विशेष म्हणजे या रिदास कंपनीने औरंगाबादमध्येही अनेकांना चुना लावला आहे.
तुमची फसवणूक झाली असेल तर…
रिदास इंडिया प्रॉपर्टीज या कंपनीकडून आणखी कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी कागदपत्रांसहीत आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय बुलडाणा येथे संपर्क साधण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक कैलास राहणे यांनी केले आहे.