तुरीच्या खोडक्या पेटवल्या अन् त्यातच गेला तोल… शेतकर्‍याचा दुर्दैवी अंत!

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतातील तुरीच्या पडलेल्या खोडक्या पेटवून दिल्यानंतर तोल जाऊन त्याच आगीत पडलेल्या शेतकर्यांचा करुण अंत झाला. ही घटना मेहकर तालुक्यातील मोळा येथे समोर आली आहे. दत्तात्रय किसन पाटील (67, रा. मोळा) असे मृत्यू झालेल्या शेतकर्याचे नाव आहे. त्यांच्या शेतातील बांधावर गेल्या वर्षीच्या तुरीच्या खोडक्या पडलेल्या होत्या. त्या त्यांनी पेटवून दिल्या. याचदरम्यान …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतातील तुरीच्या पडलेल्या खोडक्या पेटवून दिल्यानंतर तोल जाऊन त्याच आगीत पडलेल्या शेतकर्‍यांचा करुण अंत झाला. ही घटना मेहकर तालुक्यातील मोळा येथे समोर आली आहे. दत्तात्रय किसन पाटील (67, रा. मोळा) असे मृत्यू झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांच्या शेतातील बांधावर गेल्या वर्षीच्या तुरीच्या खोडक्या पडलेल्या होत्या. त्या त्यांनी पेटवून दिल्या. याचदरम्यान त्यांचा तोल जाऊन ते आगीत पडले. बाजूलाच बोरीच्या काट्यात पडल्याने ते आगीतून बाहेर येऊ शकले नाहीत. होरपळून त्यांचा मृत्यू झाला. 7 जानेवारीला सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. पाटील यांच्याकडे एक एकर शेती असून, त्यांच्या पश्‍चात तीन मुली, एक मुलगा, नातू, सून असा परिवार आहे.