तुला तो आवडतो, मी का नाही?; विधवेला दरवाजा वाजवून नको ती भाषा!; पिंपरखेडची घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः त्याच्या घरी का गेलीस… तुला तो आवडतो…मी का नाही आवडत? असे म्हणून विधवेसोबत अश्लील संवाद करून शिविगाळ करणाऱ्या तरुणाविरुद्ध किनगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पिंपरखेड (ता. सिंदखेड राजा) येथे २२ जूनच्या रात्री ९ च्या सुमारास घडली. तिने काल, २३ जूनला पोलिसांत तक्रार दिली. पिंपरखेड येथे ३५ वर्षीय …
 
तुला तो आवडतो, मी का नाही?; विधवेला दरवाजा वाजवून नको ती भाषा!; पिंपरखेडची घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः त्‍याच्‍या घरी का गेलीस… तुला तो आवडतो…मी का नाही आवडत? असे म्‍हणून विधवेसोबत अश्लील संवाद करून शिविगाळ करणाऱ्या तरुणाविरुद्ध किनगाव राजा पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना पिंपरखेड (ता. सिंदखेड राजा) येथे २२ जूनच्‍या रात्री ९ च्‍या सुमारास घडली. तिने काल, २३ जूनला पोलिसांत तक्रार दिली.

पिंपरखेड येथे ३५ वर्षीय विधवा महिला दोन मुली व एका मुलासोबत राहते. परवा रात्री घरात असताना दरवाजाचा खटखट आवाज आल्याने तिने दरवाजा उघडला. बाहेर विशाल अर्जुन राठोड उभा होता. तिने त्याला दरवाजा का वाजवला, असे विचारले. तेव्‍हा तो म्‍हणाला, तू गावातील XXXX च्‍या घरी का गेली? तुला XXXX आवडतो का? मी आवडत नाही का? तेव्हा तिने त्‍याला तू असे वेडेवाकडे बोलू नकोस. चूपचाप तुझ्या घरी जा, असे म्‍हटले. त्‍यावर तो संतापून शिविगाळ करू लागला.

ही महिला आपल्या सासूसोबत विशालच्‍या घरी त्‍याच्‍या आई-वडिलांना सांगायला गेली तर त्‍याच्‍या आई-वडिलांनी आमच्या मुलावर विनाकारण आरोप घेतेस. परत आमच्‍या मुलाबाबत असे आरोप केले तर तुला जिवाने ठार मारू, अशी धमकी दिली. तिने किनगाव राजा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी विशालसह त्‍याचे वडील अर्जुन काशीराम राठोड, बेबीबाई अर्जुन राठोड (सर्व रा. पिंपरखेड) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला. तपास पोहेकाँ रमेश गोरे करत आहेत.