तूर काढणीत मशीनमध्ये अडकून महिलेचा मृत्यू; मोताळा तालुक्यातील दुर्दैवी घटना

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तूर काढणी सुरू असताना थ्रेशर मशीनमध्ये अडकून 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना तळणी (ता. मोताळा) शिवारात 17 जानेवारीला दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.भारती सुनील खराटे (रा. तळणी, ता. मोताळा) असे मृत्यू झालेल्या या महिलेचे नाव आहे. शेतकरी सुनील ओंकार खराटे यांच्या शेतात तूर काढणी सुरू असून, यासाठी गावातीलच ट्रॅक्टर …
 

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तूर काढणी सुरू असताना थ्रेशर मशीनमध्ये अडकून 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना तळणी (ता. मोताळा) शिवारात 17 जानेवारीला दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.भारती सुनील खराटे (रा. तळणी, ता. मोताळा) असे मृत्यू झालेल्या या महिलेचे नाव आहे.

शेतकरी सुनील ओंकार खराटे यांच्या शेतात तूर काढणी सुरू असून, यासाठी गावातीलच ट्रॅक्टर व थ्रेशर मशीन लावलेली होती. खराटे यांच्या पत्नी भारती थ्रेशरच्या मागे तू जमा करत होत्या. त्याचवेळी त्यांचे केस मशीनमध्ये अडकले गेले. त्या मशीनमध्ये ओढल्या जाऊन जागीच मृत्यू झाला. बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. त्यांच्या पश्‍चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. तपास पोलीस निरिक्षक माधवराव गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहकाँ प्रल्हाद वानखेडे, पोकाँ ज्ञानेश्‍वर धामोडे करत आहेत.