तूर पचली नाही… चोरणाऱ्यांसोबत विकत घेणाराही गोत्‍यात! बोराखेडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मूर्ती (ता. मोताळा) येथे 15 कट्टे तूर चोरणाऱ्या दोघांना आणि चोरीची तूर विकत घेणाऱ्या व्यापाऱ्याला अशा एकूण 3 जणांना बोराखेडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेली 9 क्विंटल तूर सुद्धा जप्त करण्यात आली आहे. 22 फेब्रुवारी रोजी अमोल सुधाकर खाकरे (रा. मूर्ती, ता. मोताळा) यांनी त्यांच्या गोडाऊनमधील 15 कट्टे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मूर्ती (ता. मोताळा) येथे 15 कट्टे तूर चोरणाऱ्या दोघांना आणि चोरीची तूर विकत घेणाऱ्या व्‍यापाऱ्याला अशा एकूण 3 जणांना बोराखेडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेली 9 क्विंटल तूर सुद्धा जप्त करण्यात आली आहे.

22 फेब्रुवारी रोजी अमोल सुधाकर खाकरे (रा. मूर्ती, ता. मोताळा) यांनी त्यांच्या गोडाऊनमधील 15 कट्टे तूर (अंदाजे किंंमत 54 हजार रुपये) चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, पोलिसांनी तपास करत योगेश बळीराम आढाव आणि आनंद धोंडीराम शिराळ (दोन्ही रा. मूर्ती) यांना काल 3 मार्च रोजी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी चोरलेली तूर धामणगाव बढे (ता. मोताळा) येथील आकाश संजय उबाळे याला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यालाही अटक करत तूर जप्त केली व गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकीसुद्धा जप्त केल्या आहेत. ही कारवाई बोराखेडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार माधवराव गरुड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अनिल भुसारी, पो.हे.काँ. अनिल सोनुने, पोलीस शिपाई सुनील थोरात, मंगेश पाटील, शिवाजी मोरे यांनी पार पाडली.