एका डॉक्‍टरची विकृती… पत्‍नीला म्‍हणे घरच्यांसाठी तुझ्यासोबत लग्‍न केले!; ५० लाख आणलेस तरच पत्‍नी म्‍हणून दर्जा; पहिल्या रात्रीही ठेवले नाहीत शरीरसंबंध!

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगावमधील एका तरुण विवाहितेला डॉक्टर पतीच्या विकृतीमुळे पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली आहे. “घरच्यांसाठी मी तुझ्यासोबत लग्न केले आहे. आपण लोकांसमोरच पती-पत्नी म्हणून राहू. बाकी काही अपेक्षा ठेवू नको,’ असे म्हणत अगदी लग्नाच्या पहिल्या रात्रीही विवाहितेला शरीरसंबंधापासून डॉक्टरने वंचित ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. ५० लाख रुपयांसाठी हा प्रकार घडल्याची …
 
एका डॉक्‍टरची विकृती… पत्‍नीला म्‍हणे घरच्यांसाठी तुझ्यासोबत लग्‍न केले!; ५० लाख आणलेस तरच पत्‍नी म्‍हणून दर्जा; पहिल्या रात्रीही ठेवले नाहीत शरीरसंबंध!

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगावमधील एका तरुण विवाहितेला डॉक्‍टर पतीच्‍या विकृतीमुळे पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली आहे. “घरच्यांसाठी मी तुझ्यासोबत लग्‍न केले आहे. आपण लोकांसमोरच पती-पत्‍नी म्‍हणून राहू. बाकी काही अपेक्षा ठेवू नको,’ असे म्‍हणत अगदी लग्‍नाच्‍या पहिल्या रात्रीही विवाहितेला शरीरसंबंधापासून डॉक्‍टरने वंचित ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. ५० लाख रुपयांसाठी हा प्रकार घडल्याची तक्रार विवाहितेने केली असून, यात त्‍याला सासू, सासरे, नणंद आणि नात्याने जावई लागणाऱ्याने साथ दिल्याचा आरोप केला आहे. शेगाव शहर पोलिसांनी जळगाव खानदेश येथील डॉक्‍टर पती, डॉक्‍टर सासऱ्यासह पाच जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

शेगाव शहरातील धानुका कंपाऊंड भागातील रहिवासी सौ. उमा गोविंद तापडिया यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. डॉ. गोविंद अनिल तापडिया (पती), डाॅ. अनिल श्रीकिसन तापडिया (सासरा), सौ. भारती अनिल तापडिया (सासू, रा. प्लाॅट क्रमांक १, ईश्वर काॅलनी, पंचमुखी हनुमान मंदिराजवळ, जळगाव खानदेश), सौ. पायल शैलेश गांधी (नणंद), शैलेश घनश्याम गांधी (नंदोई, रा. छागानीनगर दुर्गा विहारजवळ, आेम चक्कीच्या बाजूला अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत. सौ. उमा यांचे लग्‍न २५ नोव्‍हेंबर २०२० रोजी डॉ. गोविंदसोबत झाले. त्‍यानंतर सौ. उमा जळगाव खानदेश येथे एकत्रित कुटुंबात नांदायला गेल्या. पती डाॅक्टर असल्यामुळे त्‍याला लग्नात ५० लाख रुपयांच्‍या हुंड्याची अपेक्षा होती. मात्र सौ. उमा यांच्या वडिलांनी एवढे पैसे न दिल्याने तो नाराज होता.

याच कारणामुळे त्‍याने लग्नानंतरच्‍या पहिल्या रात्रीच्‍या सुखापासून पत्‍नीला वंचित ठेवले. त्‍याने पहिल्या रात्रीच उमा यांना सांगितले, की त्‍याचे लग्न त्याच्‍या इच्छेविरुध्द झालेले असून, फक्त आई-वडिलाच्या इच्छेला मान देण्यासाठी त्याने लग्‍न केले आहे. यानंतरही त्‍याने कधीच पतीपत्नीचे नातेसंबंध तिच्‍यासोबत ठेवले नाहीत की शारीरिक संबंधही प्रस्‍थापित केले नाहीत. लोकांना दाखविण्यासाठी आपण पती- पत्नी झालो आहोत. तू माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नको, असे डॉक्‍टर पती त्‍यांना म्‍हणाला. फारकती घेण्याचा सल्लाही पतीने दिला. मात्र उमा यांनी नकार दिला असता पतीसह सासरच्यांनी शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले. मार्च २०२१ मध्ये त्‍यांनी उमा यांच्‍यासोबत बोलणेही बंद केले. ३ एप्रिलला धमकावून माहेरवरून ५० लाख रुपये घेऊन ये, अन्यथा या घरात राहायचे नाही, असे सांगून उमा यांना नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर काढून दिले. पैसे न आणता घरात आल्यास जिवाचे बरेवाईट करू, अशी धमकीही दिली. त्‍यामुळे उमा या माहेरी शेगाव येथे आल्या व पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तपास पोहेकाँ श्री. रोहणकर करत आहेत.