तू माझ्यावर प्रेम करते का? म्‍हणत ओढत नेले…!; जलंब येथील घटना

जलंब (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जलंब (ता. शेगाव) येथे 12 वर्षीय मुलीच्या विनयभंगाची घटना समोर आली आहे. एका 30 वर्षीय युवकाने 12 वर्षीय मुलीला तू माझ्यावर प्रेम करते का? असे म्हणत उजवा हात धरून ओढत नेले. 27 मार्चला दुपारी 3 वाजता ही घटना जलंब रेल्वेस्टेशनजवळील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर घडली. सुनील भागवत पजई (रा. जलंब) असे …
 

जलंब (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जलंब (ता. शेगाव) येथे 12 वर्षीय मुलीच्‍या विनयभंगाची घटना समोर आली आहे. एका 30 वर्षीय युवकाने 12 वर्षीय मुलीला तू माझ्यावर प्रेम करते का? असे म्‍हणत उजवा हात धरून ओढत नेले. 27 मार्चला दुपारी 3 वाजता ही घटना जलंब रेल्‍वेस्‍टेशनजवळील प्राथमिक आरोग्‍य केंद्रासमोर घडली.

सुनील भागवत पजई (रा. जलंब) असे आरोपी युवकाचे नाव आहे. त्‍याची वाईट नजर गल्लीतीलच 12 वर्षीय मुलीवर पडली. बऱ्याच दिवसांपासून तिच्‍या पाळतीवर असणाऱ्या सुनीलने 27 मार्चला दुपारी तिला प्राथमिक आरोग्‍य केंद्राजवळ गाठले आणि हात धरून प्रेम करते का म्‍हणून ओढत नेत विनयभंग केला. या प्रकरणी मुलीच्‍या आईने जलंब पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यावरून सुनील पजईविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.