तू माझ्यावर प्रेम का करत नाही, असे म्‍हणून भररस्‍त्‍यात तरुणीला छेडले; तिने गाठले पोलीस ठाणे, खामगावातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तू माझ्यासोबत का बोलत नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यावर का करत नाही, असे म्हणून छेड काढत तुझे लग्न कसे होते तेच पाहतो, अशी धमकी देणाऱ्या मजनूविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. २२ वर्षीय तरुणीने या प्रकरणात तक्रार दिली. नीलेश गुलाबराव महल्ले (वय अंदाजे २५ ते ३० दरम्यान, …
 
तू माझ्यावर प्रेम का करत नाही, असे म्‍हणून भररस्‍त्‍यात तरुणीला छेडले; तिने गाठले पोलीस ठाणे, खामगावातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तू माझ्यासोबत का बोलत नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यावर का करत नाही, असे म्‍हणून छेड काढत तुझे लग्‍न कसे होते तेच पाहतो, अशी धमकी देणाऱ्या मजनूविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. २२ वर्षीय तरुणीने या प्रकरणात तक्रार दिली.

नीलेश गुलाबराव महल्ले (वय अंदाजे २५ ते ३० दरम्‍यान, रा. घाटपुरी नाका खामगाव) असे आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणीही तो राहत असलेल्या भागात राहते. २७ जुलैच्‍या सायंकाळी पाचच्‍या सुमारास आईसाहेब मंगल कार्यालयाजवळील पेट्रोल पंपाजवळ त्‍याने तिला आवाज देऊन थांबवले. आधी प्रेमाची गळ घातली. तरुणीने नकार देताच तुझे लग्‍न कसे होते पाहून घेईल. तुझी बदनामी करीन, अशा धमक्या त्‍याने दिल्या. तपास एएसआय मनोज खुंटे करत आहेत.