ते आले, त्‍यांनी पाहिले अन्‌ घेऊन चालले…पण मध्येच कुत्रे भुंकले!; बुलडाण्यातील चोरीची अर्धवट कहानी!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः टिनशेडचे काम सुरू असलेल्या ठिकाणावरून एक टिनपत्रा दोघे चोरून घेऊन जात होते. त्याचवेळी कुत्रे भुंकले. म्हणून शेजाऱ्याने पाहिले. त्याने तातडीने प्लॉटमालकाला खबर दिली. मालक येईपर्यंत कॉलनीतील लोकांनी जमून चोराला पकडून ठेवले होते. त्याच्यासोबत चोर फरारी झाला होता. चोराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना मलकापूर रोडवरील गणपतीनगरात आज, ३० जुलैला …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः टिनशेडचे काम सुरू असलेल्या ठिकाणावरून एक टिनपत्रा दोघे चोरून घेऊन जात होते. त्‍याचवेळी कुत्रे भुंकले. म्‍हणून शेजाऱ्याने पाहिले. त्‍याने तातडीने प्‍लॉटमालकाला खबर दिली. मालक येईपर्यंत कॉलनीतील लोकांनी जमून चोराला पकडून ठेवले होते. त्‍याच्‍यासोबत चोर फरारी झाला होता. चोराला पोलिसांच्‍या ताब्‍यात देण्यात आले. ही घटना मलकापूर रोडवरील गणपतीनगरात आज, ३० जुलैला पहाटे साडेतीनच्‍या सुमारास घडली.

मनिष रवींद्र खोडके (२७, रा. भीमनगर, बुलडाणा) असे पकडण्यात आलेल्या चोराचे नाव आहे. त्‍याचा साथीदार जाकीर खान शब्बीर खान (३५, रा इकबाल चौक, बुलडाणा) फरारी झाला आहे. या प्रकरणी आशिष रामहरी उगळकर (३२, रा. वानखेडे ले आउट) यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्‍यांचा गणपतीनगरात प्लाॅट आहे. या प्‍लॉटवर टिनशेड बांधण्याचे काम सुरू आहे. प्लाॅटशेजारी विष्णू पवार कुटुंबासह राहतात. ३० जुलैला पहाटे साडेतीनला विष्णू पवार यांच्‍या घराबाहेर कुत्रे भुंकत असल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता अंधारात दोन चोरटे उगळकर यांच्‍या प्‍लॉटवरील २३०० रुपयांचा टिनपत्रा चोरून नेताना दिसले. पवार यांनी तातडीने उगळकर यांना कळवून चोरीची माहिती दिली. त्‍यामुळे उगळकर तातडीने प्‍लॉटवर पोहोचले. तोपर्यंत रहिवाशांनी एकाला चोराला पकडून ठेवले होते, तर दुसरा चोर पळून गेला होता. तपास एएसआय श्री. कानडजे करत आहेत.