“ते’ करतात, दोन-तीन लग्न, जन्माला घालतात दहा मुले!’

भोपाळ : मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चाैहान यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा सिलसिला काही थांबायला तयार नाही. उषा ठाकूर यांच्यानंतर पंचायत आणि ग्राम विकास मंत्री असणाऱ्या महेंद्र सिंह सिसोदिया यांनी मुस्लिम समाजावर टीका करणारं आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे.गुना मतदारसंघामध्ये पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सिसोदिया यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांचे …
 

भोपाळ : मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चाैहान यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा सिलसिला काही थांबायला तयार नाही. उषा ठाकूर यांच्यानंतर पंचायत आणि ग्राम विकास मंत्री असणाऱ्या महेंद्र सिंह सिसोदिया यांनी मुस्लिम समाजावर टीका करणारं आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे.
गुना मतदारसंघामध्ये पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सिसोदिया यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांचे ते निकटवर्तीय आहे. मुस्लिम समाजातील लोक दोन-तीन करतात. दहा-दहा मुलं जन्माला घालतात. त्यांच्यावर नियंत्रणं ठेवलं पाहिजे, असं ते म्हणाले. लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदे आहेत; मात्र समान नागरी कायदा करणे आवश्यक आहे. प्रत्येक समाजातील व्यक्तीने किती मुलांना जन्माला घालावं याचं बंधन असलं पाहिजे. मुस्लिम समाजामध्ये हा आकडा ठरलेला नाही, असेही त्‍यांनी म्‍हटलं आहे. सिसोदिया यांचं हे पहिलंच वादग्रस्त वक्तव्य नाही. गुना येथे एका रस्त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. रस्ता बनवण्यासाठी नियम आणि कायद्याचं उल्लंघन करावं लागलं तरी हरकत नाही, अशी सूट अधिकाऱ्यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं होतं.