तो निघाला अट्टल गुन्‍हेगार!; पोलिसांच्‍या चौकशीत अनेक गुन्ह्यांची कबुली

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चाकूचा धाक दाखवून खेळणे विक्रेत्याला लुटल्याची घटना १९ जुलै रोजी खामगाव- नांदुरा रोडवर खामगाव शहरात घडली होती. यातील आरोपी मोहम्मद दानिश शेख अकिल (२२) याला २४ तासांच्या आत रोहिणखेड (ता. मोताळा) येथून ताब्यात घेतले होते. पोलीस चौकशीत त्याने अनेक गुन्ह्यांची कबुली दिली. मो. दानिश याने खामगाव शहरात …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चाकूचा धाक दाखवून खेळणे विक्रेत्याला लुटल्याची घटना १९ जुलै रोजी खामगाव- नांदुरा रोडवर खामगाव शहरात घडली होती. यातील आरोपी मोहम्मद दानिश शेख अकिल (२२) याला २४ तासांच्या आत रोहिणखेड (ता. मोताळा) येथून ताब्यात घेतले होते. पोलीस चौकशीत त्‍याने अनेक गुन्ह्यांची कबुली दिली.

मो. दानिश याने खामगाव शहरात आणखी दोन ठिकाणी गुन्हे केल्याचे सांगितले. ५ जूनला सौ. नंदा जनार्दन पवार यांनी खामगावच्या स्टेट बँकेतून काढलेले चार हजार रुपये त्यानेच लंपास केले होते. २ डिसेंबर२०२० रोजी बाळकृष्ण प्रल्हाद गवई यांनी बँक ऑफ बडोदा खामगावमधून काढलेले तेवीस हजार रुपये सुद्धा मो. दानिश यानेच लंपास केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मोहम्मद दानिश हा अट्टल गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.