‘तो’ निर्णय ऐकून बुलडाण्यातील 4 हजार विद्यार्थी हैराण!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 14 मार्चला होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. परीक्षा ऐन तोंडावर आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतल्याने सरकारला विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता नसल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. मागील वर्षी सुद्धा कोरोनामुळे परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. याही वर्षी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे कारण देत …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 14 मार्चला होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा  पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

परीक्षा ऐन तोंडावर आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतल्याने सरकारला विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता नसल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. मागील वर्षी सुद्धा कोरोनामुळे परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. याही वर्षी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे कारण देत आयोगाने अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकलली आहे.बुलडाणा शहरात विविध अभ्यासिकांमध्ये 3 ते 4 हजार विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. अनेक विद्यार्थी गेल्या 7 ते 8 वर्षांपासून अभ्यास करीत आहेत.

विद्यार्थी म्‍हणतात…

आधीच बेरोजगारी वाढली आहे. त्यातच परीक्षा पुढे ढकलल्याने अनेक विद्यार्थ्यांचे वय वाढत आहे. वय वाढल्याने पुढील वर्षी काही विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार नाही. मग आता काय आम्ही जीव द्यावा?

-अक्षय गुलाये,परीक्षार्थी

आयोगाचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे.  इतर सर्व कार्यक्रम चालतात. मात्र परीक्षा घेतल्यानेच कोरोना कसा फैलावतो? नियमांची अमलबजावणी करीत परीक्षा घेणे हे सरकारचे कर्तव्य नाही का?

-गजानन परिहार, परीक्षार्थी बुलडाणा

आयोगाच्या या निर्णयाने अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले जाणार आहे. वर्ष वाया गेल्याने सरकार विद्यार्थ्याचे झालेले नुकसान भरून काढणार का?

-सचिन चौहान, परीक्षार्थी बुलडाणा