तो नीट वागवत नाही… तिने कारण शोधले तर निघाली दोघांत ‘तिसरी’!; देऊळगाव राजा पोलिसांनी 11 जणांविरुद्ध केला गुन्‍हा दाखल

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हुंडा कमी दिला म्हणून छळ सुरू झाला… माहेरवरून दुचाकी मागितली…नंतर एक गुंठा प्लॉटही नावावर करून घेतला… एवढे करूनही हव्यास वाढत गेला… त्रास काही कमी झाला नाही… तिने यामागचे कारण शोधले तर वेगळेच काही समोर आले. दोघांत तिसरी असून, पतीचे वाशी येथील महिलेसोबत अनैतिक संबंध समोर आले. त्यानंतर छळाचा कहर …
 
तो नीट वागवत नाही… तिने कारण शोधले तर निघाली दोघांत ‘तिसरी’!; देऊळगाव राजा पोलिसांनी 11 जणांविरुद्ध केला गुन्‍हा दाखल

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः हुंडा कमी दिला म्‍हणून छळ सुरू झाला… माहेरवरून दुचाकी मागितली…नंतर एक गुंठा प्‍लॉटही नावावर करून घेतला… एवढे करूनही हव्यास वाढत गेला… त्रास काही कमी झाला नाही… तिने यामागचे कारण शोधले तर वेगळेच काही समोर आले. दोघांत तिसरी असून, पतीचे वाशी येथील महिलेसोबत अनैतिक संबंध समोर आले. त्‍यानंतर छळाचा कहर झाला. तिला घरातून हाकलून दिले. ना मुलांना भेटू देत ना नांदवत… त्‍यामुळे अखेर विवाहितेने देऊळगाव पोलीस ठाणे गाठून पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध तक्रार दिली असून, त्‍यावरून पोलिसांनी 11 जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

सौ. भारती गोविंदा राजे (30, रा. सिंदखेड राजा ह. मु. सिव्हिल कॉलनीजवळ देऊळगावराजा) हिचे लग्‍न गोविंदा बाबुराव राजे (रा. सिंदखेड राजा) याच्‍यासोबत 15 वर्षांपूर्वी 5 जून 2004 ला झाले आहे. त्‍यांना जानराव (12) व साहील (10) वर्षे अशी दोन मुले आहेत. तिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्‍हटले आहे, की लग्‍नात तिच्‍या वडिलांनी 90 हजार रुपये व सर्व संसारोपयोगी साहित्‍य आंधन म्‍हणून दिले. सासरी नांदायला गेल्यावर पती व सासरच्यांनी तिला सुरुवातीचे 4 ते 5 महिने चांगले वागविले. नंतर तुझ्या वडिलांनी आम्हाला जास्त हुंडा दिला नाही. तुझ्या बापाला मोटारसायकल घेऊन माग, असे म्हणून सतत शिविगाळ व मारहाण करू लागले. त्यामुळे तिच्‍या वडिलांनी पॅशन प्लस ही मोटारसायकल घेऊन दिली. त्‍यानंतर काही दिवसांनी पुन्‍हा पैशांसाठी छळ सुरू झाला. तेव्‍हा तिच्‍या वडिलांनी एक गुंठा प्लॉट पतीच्या नावावर करून दिला. त्‍यानंतरही त्रास कमी झाला नाही.

पती गोविंदा राजे यांना सासरे बाबुराव राजे, सासू मुक्ताबाई, दीर आनंदा बाबुराव राजे, दीर शिवाजी बाबुराव राजे, भाया संभाजी अण्णा राजे, भाया कैलास अण्णा राजे, जाऊ अन्नापूर्णाबाई आनंदा राजे, जाऊ गंगूबाई संभाजी राजे, जाऊ जान्हवीबाई कैलास राजे, चुलत सासू दुर्गाबाई अण्णा राजे (सर्व रा. सिंदखेड राजा) हे भडकावून देत असत. तुझ्या सासऱ्याचा अजून एक राहिलेला प्लॉट तुझ्या नावावर करून घे, नाहीतर हिला सोडून दे. आपण दुसरी बायको करून देऊ, असे सतत त्‍याला चिथावण्या देत असत. याचदरम्‍यान भारती यांना पतीचे वाशी येथील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे कळाले. त्‍यानंतर छळाचा कहर होत मारहाण करून तिला घराबाहेर काढून देण्यात आले. दोन्ही मुले हिसकावून घेतली. सध्या भारती माहेरी राहत असून, त्‍यांना मुलांनाही भेटू दिले जात नाही. पोलिसांनी सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास देऊळगाव राजा पोलीस करत आहेत.