‘तौक्‍ते’चे साईड इफेक्‍ट बुलडाण्यावरही…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तौक्ते चक्रीवादळाचा फटका पुणे, मुंबईला बसला असताना बुलडाणा जिल्ह्यावरही त्याचे थोडेफार साईडइफेक्ट उमटले. अंदाजे 40 किलोमीटर ताशी वेगाने वाहणारे वारे जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीला कारणीभूत ठरले आहेत. 16 व 17 मे रोजी या सोसाट्याच्या वाऱ्यांनी प्रामुख्याने चिखली तालुक्याला हादरा देत 20.60 हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान केले आहे. कडक उन्हाच्या झळांनी जिल्हावासी होरपळून …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तौक्‍ते चक्रीवादळाचा फटका पुणे, मुंबईला बसला असताना बुलडाणा जिल्ह्यावरही त्‍याचे थोडेफार साईडइफेक्‍ट उमटले. अंदाजे 40 किलोमीटर ताशी वेगाने वाहणारे वारे जिल्ह्यात पिकांच्‍या नुकसानीला कारणीभूत ठरले आहेत. 16 व 17 मे रोजी या सोसाट्याच्‍या वाऱ्यांनी प्रामुख्याने चिखली तालुक्‍याला हादरा देत 20.60 हेक्‍टरवरील फळपिकांचे नुकसान केले आहे.

कडक उन्‍हाच्‍या झळांनी जिल्हावासी होरपळून निघत असताना अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला. त्‍यामुळे उकाड्यातून काही दिलासा मिळाला असला तरी, या वाऱ्यांनी नंतर धारण केलेला आक्रमकपणा धडकी भरवणारा ठरला. तौक्‍तेशी नातं सांगणारा हा वारा आंब्‍याचे नुकसान करणारा ठरला असून, याशिवाय जिल्ह्यातील अनेक भागांत फळबागांचे नुकसान झाले. चिखली तालुक्‍यात पपई, संत्रा, केळी, ज्‍वारी या फळपिकांचे नुकसान झाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी सांगितले.

महावितरणची बत्ती गुल…

पावसाळ्यात तोंडावर महावितरणने मॉन्‍सूनपूर्व कामे हाती घेतली असून, तारांत अडकणाऱ्या झाडांच्या फांद्यांसह अन्य दुरुस्‍ती कामे सुरू आहेत. त्‍यामुळे जिल्हाभर वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. आधीच उकाडा त्‍यात वीज गायब यामुळे बुलडाणेकर घामांनी डबडबल्याचे पहायला मिळाले. बुलडाण्याच्‍या चिखली रोड परिसरात वारंवार वीज येजा करत असल्याने अनेकांची विद्युत उपकरणे खराब झाल्‍याच्‍या तक्रारी आहेत.