…त्यामुळे बुलडाणा तहसीलमध्ये उरला एकच नायब तहसीलदार! शासनाने 4 “नेले’ अन्‌ एकबी नाय पाठवला!! त्या आदेशाने निर्माण झाली मजेदार स्थिती

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बदल्या मग त्या प्रशासकीय वा विनंती बदल्या असोत, त्या प्रशासकीय वर्तुळासाठी सामान्य बाब ठरते. मात्र क्वचित प्रसंगी बदल्यांमुळे प्रशासन वा आस्थापनांत मोठी मजेदार स्थिती निर्माण होते. बुलडाणा तहसील कार्यालय सध्या याचा मजेदार प्रत्यय घेत आहे. महसूल मंत्रालयाने निगर्मित केलेल्या आदेशानुसार अमरावती महसूल विभागातील 31 नायब तहसीलदारांच्या बदल्या …
 
…त्यामुळे बुलडाणा तहसीलमध्ये उरला एकच नायब तहसीलदार! शासनाने 4 “नेले’ अन्‌ एकबी नाय पाठवला!! त्या आदेशाने निर्माण झाली मजेदार स्थिती

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बदल्या मग त्या प्रशासकीय वा विनंती बदल्या असोत, त्या प्रशासकीय वर्तुळासाठी सामान्य बाब ठरते. मात्र क्वचित प्रसंगी बदल्यांमुळे प्रशासन वा आस्थापनांत मोठी मजेदार स्थिती निर्माण होते. बुलडाणा तहसील कार्यालय सध्या याचा मजेदार प्रत्यय घेत आहे.

महसूल मंत्रालयाने निगर्मित केलेल्या आदेशानुसार अमरावती महसूल विभागातील 31 नायब तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील 11 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. इथपर्यंत ठीक आहे. पण बुलडाणा तहसीलमधील 4 नायब तहसीलदारांच्या बदल्या तर करण्यात आल्या पण त्यांच्या जागी कोणाचीच बदली करण्यात आली नाहीये!

अतिशय मेहनतीने निवडणूक विभागाचा कारभार पाहणाऱ्या मंजुषा नेताम यांची नायब तहसीलदार “संगायो’ संग्रामपूर, एस. एच. भांबळे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार महसूलपदी, श्रीमती व्ही. डी. गौर यांची मोताळा येथे एनटी “संगायो’, पदी बदली झाली, निवासी नायब तहसीलदार आशिष सानप यांची स्वजिल्ह्यात (सोलापूरमधील माळशिरसला) बदली झाली. पुरवठा विभागाचे ए. व्ही. पवार यांना अभय देत त्याच पदावर 1 वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. कळस म्हणजे या सर्वांना तात्काळ नवीन ठिकाणी रुजू होण्याचे आदेश बजावण्यात आले. यामुळे बदली झालेले अधिकारी तातडीने रुजू झाले, मात्र त्यांच्या जागी आदेशात कोणाचीच बदली करण्यात आली नसल्याने आता तहसीलमध्ये सध्यातरी एकच नायब तहसीलदार उरले आहेत! आता हे असेच राहिले तर श्री. पवार यांच्याकडे चौघांचा अतिरिक्त प्रभार राहणार हे उघड आहे.

“पीके’ना मुदतवाढ
याशिवाय जिल्ह्यातील आणखी एन. टी.च्या बदल्या झाल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील अभ्यासू, परिश्रमी व काम जास्त बोलणे कमी या वर्गवारीतील अधिकारी म्हणून ओळखले जाणारे नायब तहसीलदार पी. के. करे यांना त्याच जागेवर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. गृह शाखेचा कारभार पाहताना त्यांनी कोविड निर्देश, निर्बंध यांचे आजवर शेकडोंच्या संख्येत आदेश तयार केले, तेही वेळेत करण्यावर त्यांचा कटाक्ष राहिला. शासनाची एसोपी, निर्देश यांचा अभ्यास करून निर्धारीत वेळेत हे काम पार पाडण्याची जबाबदारी त्यांनी अविश्रांत सांभाळली. याशिवाय सिंदखेड राजाच्या नायब तहसीलदार अस्मा मुजावर यांची देउळगाव राजा तहसील, मेहकरच्या योगेश्वरी परळीकर यांची लोणार येथे, मोताळा येथे कार्यरत एस. एस. चव्हाण यांची नांदुरा, खामगावचे बी. एस. किटे यांची जळगाव जामोद, नांदुऱ्याचे संजय मार्कंड यांची जळगाव जामोद येथे बदली झाली आहे.