त्‍याने गावातच सुरू केला स्वतःचा “पेट्रोलपंप’..!; चढ्या भावाने विकत होता पेट्रोल, डिझेल!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कॅनमध्ये डिझेल, पेट्रोल घेऊन चढ्या भावाने विकणाऱ्यास बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने आज, ९ जुलैला पहाटे पावणेदोनच्या सुमारास ताब्यात घेतले. ही कारवाई आसलगाव (ता. जळगाव जामोद) येथे करण्यात आली. विजय वसंता वानखडे असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध एलसीबीचे पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत जिंदमवार यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कॅनमध्ये डिझेल, पेट्रोल घेऊन चढ्या भावाने विकणाऱ्यास बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने आज, ९ जुलैला पहाटे पावणेदोनच्‍या सुमारास ताब्‍यात घेतले. ही कारवाई आसलगाव (ता. जळगाव जामोद) येथे करण्यात आली.

विजय वसंता वानखडे असे आरोपीचे नाव आहे. त्‍याच्‍याविरुद्ध एलसीबीचे पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत जिंदमवार यांच्‍या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. वानखडे हा पेट्रोल व डिझेल अवैधरित्या वाढीव भावाने विकत असल्याची माहिती एलसीबीच्‍या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आसलगाव येथे छापा मारण्यात आला. त्‍यांच्‍या ताब्‍यातून आठ लिटर डिझेल असलेली कॅन (किंमत ८००), दुसऱ्य कॅनमध्ये आठ लिटर पेट्रोल, तिसऱ्या कॅनमध्ये ४ लिटर पेट्रोल असे १२ लिटर पेट्रोल (किंमत १३२० रुपये) असा एकूण २१२० रुपयांचा मुद्देमाल त्‍याच्‍याकडून जप्‍त करण्यात आला.