त्‍याला वाटलं मोदींनीच खात्‍यात साडेपाच लाख टाकले!; त्‍याने खर्चूनही टाकले!!

पाटणा : बिहारमधील खगडियाच्या ग्रामीण बँकेने बख्तियारपूर गावात राहणाऱ्या रंजित दास या व्यक्तीच्या खात्यावर चुकून साडेपाच लाख रुपये टाकले. अचानक एवढे पैसे खात्यात आल्याने अत्यानंद झालेल्या रंजित दास यांनी पैसे काढले आणि खर्चही करून टाकले. मात्र नंतर बँकेच्या लक्षात आल्याने बँकेने रंजित दास यांना नोटीस पाठवून पैसे परत करायला सांगितले. रंजित यांनी पैसे भरण्यास नकार …
 
त्‍याला वाटलं मोदींनीच खात्‍यात साडेपाच लाख टाकले!; त्‍याने खर्चूनही टाकले!!

पाटणा : बिहारमधील खगडियाच्या ग्रामीण बँकेने बख्तियारपूर गावात राहणाऱ्या रंजित दास या व्यक्तीच्या खात्यावर चुकून साडेपाच लाख रुपये टाकले. अचानक एवढे पैसे खात्यात आल्याने अत्यानंद झालेल्या रंजित दास यांनी पैसे काढले आणि खर्चही करून टाकले. मात्र नंतर बँकेच्या लक्षात आल्याने बँकेने रंजित दास यांना नोटीस पाठवून पैसे परत करायला सांगितले. रंजित यांनी पैसे भरण्यास नकार दिल्याने बँकेच्या तक्रारीवरून रंजित दास यांना पोलिसांनी अटक केली. मार्च माहिन्यात दास यांच्या खात्यात अचानक साडेपाच लाख रुपये जमा झाले होते. पंतप्रधान मोदींनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये टाकण्याचे आश्वासन दिल्याने त्यातील हा पहिला हप्ता असावा असे आपल्याला वाटले, असे रंजित दासने पोलिसांना सांगितले. त्यामुळे या प्रकरणात नेमकी चूक कुणाची, असा प्रश्न पोलिसांनाही पडला. आता तुम्हीच सांगा चूक कुणाची?