‘त्‍या’ घरात अचानक आगी लागत होत्या; ‘अंनिस’ने जाऊन केली कानउघडणी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरात अचानक आग लागण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे गावातही खळबळ उडाली होती. भानामतीचे प्रकार असल्याच्या संशयावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली होती, अफवांचे पेव फुटले होते. प्रशासनाकडे कुटुंबियांकडून आगीत झालेल्या नुकसानीची भरपाईसुद्धा मागितली गेली आणि प्रशासनानेही मदत केली… पण प्रकार काही थांबेनात… ही बाब अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर आल्याने त्यांनी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः घरात अचानक आग लागण्याचे प्रकार घडत होते. त्‍यामुळे गावातही खळबळ उडाली होती. भानामतीचे प्रकार असल्याच्‍या संशयावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली होती, अफवांचे पेव फुटले होते. प्रशासनाकडे कुटुंबियांकडून आगीत झालेल्या नुकसानीची भरपाईसुद्धा मागितली गेली आणि प्रशासनानेही मदत केली… पण प्रकार काही थांबेनात… ही बाब अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्‍या पदाधिकाऱ्यांच्‍या कानावर आल्याने त्‍यांनी तिथे जाऊनच सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय घेतला अन्‌ 12 जूनला नांदुरा तालुक्‍यातील चांदुरबिस्वा गाठले!
एकूण सर्व परिस्‍थिती, कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर हा भानामतीचा नसून, आपसातीलच वादाचा परिपाक असल्याचे समोर आले. खोडसाळपणे आगी लावून अन्य कुटुंबियांना घाबरविण्याचा प्रकार असल्याचे दिसून आल्याने सर्व कुटुंबियांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समजावून सांगितले. यापुढे असे घडल्‍यास थेट पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात येईल आणि मग पोलीस खऱ्या ‘आगलाव्या’ला शोधून कारवाई करतील, असेही सुनावण्यात आले. जादूटोना, भानामती असे काहीही नसल्याचे त्‍यांनी सांगितले.

बुलडाणा लाइव्हशी बोलताना ‘अंनिस’चे पदाधिकारी नरेंद्र लांजेवार यांनी सांगितले, की या घटनांत कोणतेही केमिकल वगैरे वापरल्याचे दिसून आले नाही. माचिसच्‍या काड्यांनीच आग लावली जायची. कुटुंबातील सर्वांचे समुपदेशन केले असून, यापुढे काय दक्षता घ्यायची याचेही मार्गदर्शन केले आहे. श्री. लांजेवार यांच्‍यासह प्रा. डॉ. संतोष आंबेकर, शाहिणा पठाण, प्रदीप हिवाळे, दीपक फाळके यांचा ‘अंनिस’च्‍या या पथकात सहभाग होता.