त्‍या योद्ध्यांना हवे ‘सुरक्षा कवच अन्‌ शस्‍त्र’ अन्यथा 24 मे रोजी जाणार संपावर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा, मो.9822988820) ः कोरोनाच्या संकटात आशा आणि गट प्रवर्तक ‘योद्धे’ बनले खरे, पण या योद्ध्यांकडे ना सुरक्षाकवच, ना शस्त्र. सुरक्षा किट, आरोग्य कर्मचाऱ्याचा दर्जा, किमान वेतन, विमा संरक्षण, कोरोना सर्वेक्षण भत्ता, नोव्हेंबर 2020 पासून राज्य सरकारने जाहीर केलेले थकीत 2 हजार आणि 3 हजार रुपये मानधन मिळण्यासाठी आता ‘निशस्त्र’ योद्ध्यांनी सरकारविरुद्ध शंखनाद …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा, मो.9822988820) ः कोरोनाच्‍या संकटात आशा आणि गट प्रवर्तक ‘योद्धे’ बनले खरे, पण या योद्ध्यांकडे ना सुरक्षाकवच, ना शस्‍त्र. सुरक्षा किट, आरोग्‍य कर्मचाऱ्याचा दर्जा, किमान वेतन, विमा संरक्षण, कोरोना सर्वेक्षण भत्ता, नोव्‍हेंबर 2020 पासून राज्‍य सरकारने जाहीर केलेले थकीत 2 हजार आणि 3 हजार रुपये मानधन मिळण्यासाठी आता ‘निशस्‍त्र’ योद्ध्यांनी सरकारविरुद्ध शंखनाद केला आहे. 24 मे रोजी सीट या संघटनेच्‍या नेतृत्‍वात ते लाक्षणिक संपावर जाणार आहेत. तसे निवेदन महाराष्ट्र आशा व गट प्रवर्तक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांनी मुख्यंत्र्यांना पाठवले आहे. हे योद्धे एक दिवस जरी संपावर चालले असले तरी, त्‍यामुळे आरोग्‍य यंत्रणेचे नियोजन बिघडणार असून, यामुळे लसीकरण आणि कोरोनाविषयक अन्य उपाययोजनांत गोंधळ उडणार आहे. आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन श्री. गायकवाड यांच्‍यासह उपाध्यक्ष रश्मी दुबे, सचिव मंदा मसाळ, चंदा झोपे, ललिता बोदडे, संगिता काळणे, सुरेखा पवार, विजया ठाकरे, कविता चव्‍हाण, रमा मानवतकर, संगिता लोखंडे, ज्‍योती खर्चे यांनी केले आहे.