त्‍या शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावी; कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कृषी विभागाद्वारे महाडीबीटी पोर्टलवर विविध योजनांसाठी शेतकरी लाभार्थी निवडण्यासाठी लॉटरी पद्धत अवलंबण्यात आली. या लॉटरीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन आपल्या निवडीबाबत पुढील कार्यवाही करावी. महाडीबीटी पोर्टलवर कृषी विभागातील विविध योजनेंतर्गत अर्ज केलेल्या ज्या शेतकऱ्यांना ऑनलाइन सोडतीत निवड झाल्याबाबत लघुसंदेश प्राप्त झाला आहे. त्यांनी महाडीबीटी पोर्टलचे संकेतस्थळ https//mahadbtmahait.gov.in वर …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कृषी विभागाद्वारे महाडीबीटी पोर्टलवर विविध योजनांसाठी शेतकरी लाभार्थी निवडण्यासाठी लॉटरी पद्धत अवलंबण्यात आली. या लॉटरीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन आपल्या निवडीबाबत पुढील कार्यवाही करावी. महाडीबीटी पोर्टलवर कृषी विभागातील विविध योजनेंतर्गत अर्ज केलेल्या ज्या शेतकऱ्यांना ऑनलाइन सोडतीत निवड झाल्याबाबत लघुसंदेश प्राप्त झाला आहे. त्यांनी महाडीबीटी पोर्टलचे संकेतस्थळ https//mahadbtmahait.gov.in वर जावे. संकेतस्थळावर शेतकरी योजना या पोर्टलवर क्लिक करावे. त्यानंतर वापरकर्ता आयडी या पर्यावर क्लिक करावे. वापरकर्ता आयडीवर क्लिक केल्यानंतर वापरकर्ता आयडी, पासवर्ड व त्या खालील प्रतिमेत दर्शविलेले शब्द भरून लॉग इन करावे. मुख्य मेनुमधील मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपण केलेल्या सर्व अर्जाची स्थिती दिसेल. स्थितीमध्ये Upload Document For Under Scrutiny असा शेरा ज्या घटकासमोर असेल त्या घटकासाठी लॉटरीद्वारे आपली निवड झाली आहे असे समजावे. मुख्य मेनूमधील कागदपत्रे या पर्यायावर क्लिक करावी. त्यानंतर वैयक्तीक कागदपत्रे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर दर्शविलेल्या स्क्रीनवरील कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावर क्लिक करावी. कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर कागदपत्रे अपलोड स्क्रीन दिसेल. त्यात नमूद केलेली विहीत कागदपत्रे 15 केबी ते 500 केबी या आकारमानातच आपलोड करून जतन करा या पर्यायावर क्लिक करावी. तरी लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या व तसा लघुसंदेश प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे सादर करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.