थाटमाट नव्‍हता, पण उत्‍साह ओसंडून वाहला… शिवस्‍मारकाचे भूमिपूजन!; कोरोनामुळे थोडक्‍यात आवरला सोहळा

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील संगम चौकात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज, 22 फेब्रुवारीला सकाळी 10:30 वाजता झाला. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका या सोहळ्यालाही बसला. खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते आणि खासदार प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार होते. मात्र प्रशासनाच्या सूचनेनुसार थोडक्यात कार्यक्रम आवरण्यात …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील संगम चौकात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज, 22 फेब्रुवारीला सकाळी 10:30 वाजता झाला. कोरोनाच्‍या प्रादुर्भावाचा फटका या सोहळ्यालाही बसला. खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्‍या हस्ते आणि खासदार प्रतापराव जाधव यांच्‍या उपस्‍थितीत भूमिपूजन होणार होते. मात्र प्रशासनाच्‍या सूचनेनुसार थोडक्‍यात कार्यक्रम आवरण्यात आला. जिल्ह्यातील कोविड रुग्णांच्‍या वाढत्‍या संख्येमुळे जिल्ह्यात 1 मार्चपर्यंत संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी शिवस्मारक समितीचे कार्याध्यक्ष आमदार संजय गायकवाड, विधान परिषदेचे आमदार प्रताप सरनाईक, शिवस्मारक समितीचे उपाध्यक्ष राजेश हेलगे, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, अजय लाहोटी, उमेश शर्मा, भारत शेळके, कुणाल गायकवाड यांची उपस्थिती होती.