थैमान कायम! 929 पॉझिटिव्ह!!, बुलडाणा दोनशे, मलकापूर दीडशेच्या पार, 5 तालुक्यांत पुन्हा उद्रेक

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन दिवस शांत राहिलेल्या कोरोनाने पुन्हा थैमान घातल्याने गत् 24 तासांत जिल्ह्यात तब्बल 929 कोरोना रुग्ण आढळून आले! बुलडाणा तालुक्याने 200 चा तर मलकापूरने दीडशेचा आकडा पार करत यंत्रणांची झोप उडविली. तसेच 5 तालुक्यांत कोरोनानाने पुन्हा उसळी घेतल्याने विकेंड जिल्हावासीयांचा थरकाप उडविणारा ठरला आहे. मागील दोन दिवसांपासून …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दोन दिवस शांत राहिलेल्या कोरोनाने पुन्हा थैमान घातल्याने गत्‌ 24 तासांत जिल्ह्यात तब्बल 929 कोरोना रुग्ण आढळून आले! बुलडाणा तालुक्याने 200 चा तर मलकापूरने दीडशेचा आकडा पार करत यंत्रणांची झोप उडविली. तसेच 5 तालुक्यांत कोरोनानाने पुन्हा उसळी घेतल्याने विकेंड जिल्हावासीयांचा थरकाप उडविणारा ठरला आहे.

मागील दोन दिवसांपासून कोरोना आटोक्यात होता. किमान काही तालुके नियंत्रणात होते, असे सुखद चित्र होते. मात्र जिद्दबाज कोरोनाने पुन्हा उसळी घेत 929 चा आकडा गाठला. जिल्ह्यात आघाडीवर असलेल्या बुलडाणा तालुक्यात पुन्हा एकदा दोनशेचा आकडा ओलांडत 201 रुग्णांवर पोहोचला. काही दिवसांपासून दुहेरी संख्येत असणाऱ्या मलकापूरने 158 चा धोकादायक आकडा गाठत यंत्रणांना चिंताग्रस्त केलेय! एवढ्यावरच समाधान न मानता कोरोनाने अन्य 6 तालुक्यांतही धुमाकूळ घातला. शेगाव 92 रुग्‍ण, खामगाव 80, देऊळगावराजा 70, चिखली 82, नांदुरा 72, सिंदखेड राजा 62 या तालुक्यांतील आकडेवारी ही बाब स्पष्ट करणारी ठरते. या तुलनेत लोणार 38, मोताळा 28, जळगाव 23, मेहकर 22 या तालुक्यांतील पॉझिटिव्हची संख्या कमी भासते. वादग्रस्त संग्रामपूरमध्ये एकच रुग्ण आढळला, हा चमत्कार कसा हे तेथील यंत्रणांनाच माहीत!  मात्र हा अपवाद वगळला तर इतर तालुक्यांत कोरोना कधीही मुसंडी मारू शकतो.

बाधितांची टक्केवारी घातकच

दरम्यान, काल पॉझिटिव्हीटी रेट 12 टक्‍क्‍यांपर्यंत आला होता. मात्र आज 3 एप्रिलला तो 18.15 पर्यंत गेला आहे. 4332 नमुने संकलनांच्या तुलनेत 5117 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 929 पॉझिटिव्ह तर 4149 निगेटिव्ह आले आहेत.