दंडुका घेऊन रस्‍त्‍यावर थांबलेत, तुम्‍ही विनाकारण येऊन तर पहा…; आज 121 जणांना ‘प्रसाद’

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाविषयक नियम न पाळणाऱ्यांना आज, 24 मार्चलाही कारवाईचा प्रसाद घ्यावा लागला. पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने सलग दुसऱ्या दिवशी ही संयुक्त मोहीम बुलडाणा शहरात राबविली. विना परवाना वाहन चालवणे, विना नंबर प्लेटच्या गाड्या चालविणे तसेच विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. पोलीस स्टेशनच्या समोरच स्वतः ठाणेदार प्रदीप साळुंखे स्वतः रस्त्यावर उभे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाविषयक नियम न पाळणाऱ्यांना आज, 24 मार्चलाही कारवाईचा प्रसाद घ्यावा लागला. पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने सलग दुसऱ्या दिवशी ही संयुक्त मोहीम बुलडाणा शहरात राबविली.

विना परवाना वाहन चालवणे, विना नंबर प्लेटच्या गाड्या चालविणे तसेच विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. पोलीस स्टेशनच्या समोरच स्वतः  ठाणेदार प्रदीप साळुंखे  स्वतः रस्त्यावर उभे राहून कारवाई  करत होते. शहरातील जयस्तंभ चौकातही कारवाई करण्यात आली. विना परवाना,ट्रिपल सीट फिरणाऱ्या 105 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून 21000  रुपये दंड वसूल करण्यात आला, तर विना मास्क फिरणाऱ्या 16 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून 3200 रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या नेतृत्वात वाहतुक पोलीस कर्मचारी रमेश पवार, विनोद गायकवाड, गजानन भंडारी, पंजाब पैठणे, नाजूकराव वानखेडे, विठ्ठल काळुसे व नगरपालिका पथकाने केली.