दवाखान्यातून बाहेर येऊन बघतात तर दुचाकी गायब… नांदुरा शहरातील घटना

नांदुरा (प्रविण तायडे) ः नांदुरा शहरातील प्रशांत पुरुषोत्तम नाफडे (32, रा. विदर्भ चोक नांदुरा) यांची मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 5 मार्चला संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान घडली. नांदुरा पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीनुसार नाफडे यांचे नातेवाइक डॉ. बढे यांच्या दवाखान्यात भरती असल्याने त्यांना भेटण्यासाठी ते मोटर सायकल (क्र. MH 28 AH 9651) घेऊन आले होते. …
 

नांदुरा (प्रविण तायडे) ः नांदुरा शहरातील प्रशांत पुरुषोत्तम नाफडे (32, रा. विदर्भ चोक नांदुरा) यांची मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 5 मार्चला संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान घडली.

नांदुरा पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीनुसार नाफडे यांचे नातेवाइक डॉ. बढे यांच्या दवाखान्यात भरती असल्याने त्यांना भेटण्यासाठी ते मोटर सायकल (क्र. MH 28 AH 9651) घेऊन आले होते.  दवाखान्याबाहेर हँडल लॉक करून मोटारसायकल उभी केली होती. नातेवाईकांना भेटून दवाखान्यातून रात्री 8 वाजता बाहेर आले तर मोटारसायकल गायब होती. आजूबाजूला मलकापूर रोड, सिनेमा रोड, आठवडी बाजार ,खामगाव रोड या ठिकाणी जाऊन शोध घेतला. परंतु मोटारसायकल कुठेच दिसली नाही. मोटारसायकल ची किंमत 45,000 रुपये होती. पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास नांदुरा पोलीस करीत आहेत.