दस्‍त नोंदणीसाठी गर्दी करू नका, त्‍या सवलतीचा लाभ घ्या!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शासनाने जानेवारी 2021 ते मार्च 2021 या कालावधीत मुद्रांक शुल्कामध्ये व अधिभारामध्ये सूट दिली आहे. सद्यःस्थितीत शहरी भागात 4 टक्के मुद्रांक व 1 टक्का नोंदणी शुल्क लागू राहणार आहे. ग्रामीण भागात 3 टक्के मुद्रांक शुल्क व 1 टक्का नोंदणी शुल्क लागू असणार आहे. ही सवलत 31 मार्च 2021 रोजी संपुष्टात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  शासनाने जानेवारी 2021 ते मार्च 2021 या कालावधीत मुद्रांक शुल्कामध्ये व अधिभारामध्ये सूट दिली आहे. सद्यःस्थितीत शहरी भागात 4 टक्के मुद्रांक व 1 टक्का नोंदणी शुल्क लागू राहणार आहे. ग्रामीण भागात 3 टक्के मुद्रांक शुल्क व 1 टक्का नोंदणी शुल्क लागू असणार आहे. ही सवलत 31 मार्च 2021 रोजी संपुष्टात येत असल्याने नोंदणी कार्यालयामध्ये दस्त नोंदणीकरिता पक्षकांराची जास्त प्रमाणात गर्दी होत आहे.

पक्षकारांनी योग्य त्या मुद्रांक शुल्काचे चलन 31 मार्चपर्यंत काढून ठेवले असल्यास व दस्त सुद्धा 31 मार्च 2021 पर्यंत निष्पादन (दस्तावर देणार व घेणार यांची स्वाक्षरी) केल्यास  दस्तांची नोंदणी कार्यालयात येऊन पुढील चार महिने म्हणजेच जुलै 2021 पर्यंत याच दरामध्ये नोंदणी करता येईल. त्यामुळे एकाच वेळी सर्व नागरिकांनी गर्दी न करता ऑनलाईन मुद्रांक शुल्क चलन भरणा 31 मार्च पूर्वी करावा. दस्त निष्पादीत करावे व पुढील 4 महिन्यापर्यंत शासनाने दिलेल्या सवलतीचा लाभ घेऊन दस्तऐवजाची नोंदणी करावी. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहजिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी केले आहे.