दागिने काढून घेत विवाहितेचा घराबाहेर हाकलले!; बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : माहेरवरून दोन लाख रुपये आणले नाही म्हणून विवाहितेच्या अंगावरील दागिने काढून तिला घराबाहेर हाकलले. ही घटना बुलडाणा शहरातील इंदिरानगर भागात समोर आली आहे. विवाहितेने चिखलीत माहेरी गेल्यानंतर आज, २५ सप्टेंबर रोजी पती व सासूविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नाजमीन परविन शेख सोहेब …
 
दागिने काढून घेत विवाहितेचा घराबाहेर हाकलले!; बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : माहेरवरून दोन लाख रुपये आणले नाही म्हणून विवाहितेच्या अंगावरील दागिने काढून तिला घराबाहेर हाकलले. ही घटना बुलडाणा शहरातील इंदिरानगर भागात समोर आली आहे. विवाहितेने चिखलीत माहेरी गेल्यानंतर आज, २५ सप्टेंबर रोजी पती व सासूविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

नाजमीन परविन शेख सोहेब (२७, रा. इंदिरानगर, बुलडाणा) ही सध्या माहेरी सैलानीनगर, चिखली येथे गेली आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, ५ वर्षांपूर्वी तिचे लग्न बुलडाण्यातील इंदिरानगर भागात राहणाऱ्या शेख सोहेब शेख हाफिजसोबत झाले होते. लग्न झाल्यानंतर काही दिवस तिला चांगले वागविले. नंतर मात्र तुझ्या वडिलांनी हुंडा दिला नाही. चांगल्या भेटवस्तू दिल्या नाहीत म्हणून तिचा छळ करण्यात येऊ लागला, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. नवरा नेहमी मारहाण करायचा. घरातले काम येत नाही. तुला व तुझ्या लेकरांना कोणी सांभाळायचे, असे टोमणे सासू तिला देत होती. मात्र त्रासाचे दिवस निघून जातील. आपल्याला संसार करायचा आहे, असे तिला वाटत होते. मात्र त्रास कमी होण्याऐवजी सतत वाढत होता.

दोन लाख रुपये आणल्याशिवाय घरात येऊच नको, असे म्हणत तिच्या अंगावरील दागिने काढून तिला घराबाहेर हाकलून दिले. त्यामुळे ती माहेरी गेली. तिच्या वडिलांनी समझोता करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन लाख आणल्याशिवाय घरात प्रवेश नाहीच, अशी भूमिका तिच्या नवऱ्याने घेतल्याने आज चिखली पोलीस तक्रार देण्यात आली. तक्रारीवरून तिचा नवरा शेख सोहेब शेख हाफिज व सासू जेबुनीसा शेख हाफीस (दोघे रा. इंदिरानगर, बुलडाणा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.