दागिने चकाकून देतो म्‍हणत लाखाचे दागिने घेऊन भामटे पसार!; बुलडाण्यातील महिलेला गंडवले!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दागिने चकाकून देण्याच्या आमिषाला ५५ वर्षीय महिला बळी पडली. दुचाकीवरून आलेले भामटे १ लाख रुपयांचे दागिने घेऊन पसार झाले. ही घटना आज, ११ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता बुलडाणा शहरातील देशपांडे लेआऊट भागात घडली. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशपांडे ले आउटमध्ये शीला धर्मपाल इंगळे (५५) या आज दुपारी घरी एकट्याच …
 
दागिने चकाकून देतो म्‍हणत लाखाचे दागिने घेऊन भामटे पसार!; बुलडाण्यातील महिलेला गंडवले!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दागिने चकाकून देण्याच्‍या आमिषाला ५५ वर्षीय महिला बळी पडली. दुचाकीवरून आलेले भामटे १ लाख रुपयांचे दागिने घेऊन पसार झाले. ही घटना आज, ११ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता बुलडाणा शहरातील देशपांडे लेआऊट भागात घडली.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशपांडे ले आउटमध्ये शीला धर्मपाल इंगळे (५५) या आज दुपारी घरी एकट्याच होत्या. दुपारी १ वाजता अनोळखी तरुण त्यांच्या घरी आले. आम्ही तुमचे सोन्याचे व चांदीचे दागिने चकाकून देतो, दागिने चकाकून देण्याची पावडर आमच्याकडे आहे, असे ते सौ. इंगळे यांना म्हणाले. त्यामुळे सौ. इंगळे यांना त्या अनोळखी तरुणांना कुकर आणायला सांगितले.

कुकरमध्ये त्यांनी त्यांच्याकडील पावडर टाकली. इंगळे यांचे दागिने घेऊन ते कुकरमध्ये टाकल्याचे त्यांना सांगितले. कुकर ५ मिनिटांसाठी गॅसवर ठेवायला सांगितले. सौ इंगळे कुकर घेऊन किचनमध्ये गेल्या. कुकर गॅसवर ठेवल्यानंतर त्या बाहेर आल्या. तेव्हा त्यांना दोन्ही तरुण पसार झाल्याचे लक्षात आले. त्यांनी कुकर उघडून तपासले असता त्‍यात दागिने नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केली तेव्हा शेजारी धावून आले. मात्र तोपर्यंत भामटे पसार झाले होते. वृत्त लिहीपर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.