दागिने चमकवण्याच्या आमिषाला बळी पडले; तीन लाखांचे दागिने घेऊन भामटे पसार; मेहकर शहरातील घटना

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः आम्ही उज्ज्वला कंपनीची पावडर विकतो. पितळ, तांब्याच्या भांड्यांसह सोने-चांदीचे दागिने चमकवून देतो, असे म्हणून हातचलाखीने मेहकर शहरातील एका कुटुंबाचे तीन लाख रुपयांचे दागिने भामट्यांनी लांबवले. ही घटना २९ जुलैला मेहकर शहरातील नरसिंह मंदिराजवळ घडली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ३० जुलै रोजी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सौ. दीपाली …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः आम्ही उज्‍ज्वला कंपनीची पावडर विकतो. पितळ, तांब्‍याच्‍या भांड्यांसह सोने-चांदीचे दागिने चमकवून देतो, असे म्‍हणून हातचलाखीने मेहकर शहरातील एका कुटुंबाचे तीन लाख रुपयांचे दागिने भामट्यांनी लांबवले. ही घटना २९ जुलैला मेहकर शहरातील नरसिंह मंदिराजवळ घडली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ३० जुलै रोजी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सौ. दीपाली विवेक कुळकर्णी यांनी पोलिसांत तक्रार दिली की, २९ जुलैला सकाळी साडेअकराच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आले. त्यावेळी त्यांच्या सासूने त्‍यांना घरात प्रवेश दिला. आम्ही उज्‍ज्वला कंपनीची पावडर विकणारे असून, घरातील तांब्याचे,पितळेचे भांडे, देव्हाऱ्यातील देवांची चकाकी करून देतो, असे त्यांनी घरातील महिलांना सांगितले. तेव्हा सौ. कुळकर्णी यांनी मुलीच्या पायातील चांदीच्या चैनपट्ट्या चकाकी करून घेतली. हे पाहून सौ. कुळकर्णी यांच्या शेजारी राहणाऱ्या सौ. बदामे यांनी त्यांच्या दोन तोळे सोन्याच्या पाटल्या व कुळकर्णी यांच्या सासू अलका कुळकर्णी यांनी दोन्ही हातांतील सोन्याच्या बांगड्या चकाकी करण्यासाठी दिल्या.

अनोळखी व्यक्तींनी दागिने व पावडर कुकरमध्ये टाकून ते उकळवून आणायला सांगितले. त्‍यामुळे दोन्‍ही महिला कुकर घेऊन गॅसवर टेकवण्यासाठी किचनमध्ये गेल्या. बाहेर आल्या तेव्हा त्यांना दोन्ही अनोळखी व्यक्ती दिसले नाहीत. त्यांनी लगेच गॅसवरील कुकर उघडून बघितले असता त्यात दागिनेही दिसले नाहीत. हातचलाखीने नजर चुकवून दागिने भामट्यांनी कुकरमध्ये टाकलेच नव्‍हते. तीन लाख रुपयांचे वडिलोपार्जित दागिने घेऊन अनोळखी भामटे पसार झाले. त्यांना पुन्हा पहिले तर आम्ही ओळखू शकतो, असे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी दोन अनोळखी भामट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.