दारूड्या मुलाने मांडला आई-वडिलांचा छळ!; त्‍यांना मारझोड करतो… खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दारूड्या मुलाने आई-वडिलांचा छळ मांडल्याचा प्रकार खामगाव तालुक्यातील पळशी बुद्रूक येथे समोर आला आहे. ६३ वर्षीय वृद्धेने या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलापासून संरक्षणासाठी काल, १ ऑगस्टला धाव घेतली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सौ. सरोज वसंत कोळशे या वृद्धेने तक्रार दिली आहे. त्यांचे पती रेल्वेमधून सेवानिवृत्त झालेले …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दारूड्या मुलाने आई-वडिलांचा छळ मांडल्‍याचा प्रकार खामगाव तालुक्‍यातील पळशी बुद्रूक येथे समोर आला आहे. ६३ वर्षीय वृद्धेने या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलापासून संरक्षणासाठी काल, १ ऑगस्‍टला धाव घेतली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

सौ. सरोज वसंत कोळशे या वृद्धेने तक्रार दिली आहे. त्‍यांचे पती रेल्वेमधून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्‍यांना तीन मुले असून, दोन मुले मुंबईला व्यवसाय करतात. त्‍या पती व लहान मुलगा सागर यांच्‍यासह पळशीला राहतात. मुलगा सागर रोज दारू पितो. ३१ जुलैला दम्याचा आजार असल्याने सराेज कोळशे यांनी सागरला धनादेश देऊन उपचारसाठी पैसे काढून आणण्यास सांगितले. रात्री साडेनऊला त्‍याच्‍याकडे पैशाबद्दल विचारणा केली असता त्‍याने अश्लील शिविगाळ करून आई व वडिलांना गालगुच्‍चे घेत जीवे मारण्याची धमकी दिली. घरातील सामानाची फेकझोक केली. शेजाऱ्यांनी धाव घेऊन त्‍याला घराबाहेर नेले. मुलगा सागर नेहमी मला व माझ्या पतीला मारझोड करतो व शिविगाळ करतो, असे सौ. सरोज कोळशे यांनी तक्रारीत म्‍हटले आहे.