दारूबद्दल माहिती देतो म्‍हणून तरुणाच्‍या बहिणीचा विनयभंग!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दारू विक्रीबद्दल आमची माहिती पेपरला देतो असे म्हणून तरुणाला मारहाण केली. त्याला वाचविण्यासाठी धावलेल्या त्याच्या बहिणीचा विनयभंग केला. तिला अश्लील शिविगाळ मारहाण केली. ही घटना भंडारी (ता. खामगाव) येथे काल, ११ ऑक्टोबरला रात्री आठच्या सुमारास घडली. पिंपळगाव राजा पोलिसांनी ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भंडारी गावातीलच ३२ वर्षीय विवाहितेने …
 
दारूबद्दल माहिती देतो म्‍हणून तरुणाच्‍या बहिणीचा विनयभंग!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दारू विक्रीबद्दल आमची माहिती पेपरला देतो असे म्‍हणून तरुणाला मारहाण केली. त्‍याला वाचविण्यासाठी धावलेल्या त्‍याच्या बहिणीचा विनयभंग केला. तिला अश्लील शिविगाळ मारहाण केली. ही घटना भंडारी (ता. खामगाव) येथे काल, ११ ऑक्‍टोबरला रात्री आठच्‍या सुमारास घडली. पिंपळगाव राजा पोलिसांनी ३ जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

भंडारी गावातीलच ३२ वर्षीय विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली. जितेंद्र बादल गिर मच्छरे (३८), सागर हरिश्‍चंद्र धांदू (२६), अंकलेश हरिश्चंद्र धांदू (१९), विकास भागवत धांदू (२५, सर्व रा. भंडारी) अशी आरोपींची नावे आहेत. विवाहितेच्‍या भावाला आमची दारूबद्दल पेपरला माहिती का देतो, असे म्‍हणून तिघांनी मारहाण केली. विवाहिता त्‍यांना रोखायला गेली असता तिचाही विनयभंग करण्यात आला. सागरने लोखंडी पट्टीने डाव्या छातीवर तिला व तिच्‍या मारहाण करून जखमी केले. तिघांनी मोटारसायकलीचेही नुकसान केले. तपास पोलीस अंमलदार शेख जावेद करत आहेत.