दिलासा की वचन? एमपीएससी परीक्षा 21 मार्चला, जिल्ह्यात 3912 उमेदवार, 13 परीक्षा केंद्र

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यातील आघाडी सरकारचे वाभाडे काढणाऱ्या व सरकारला अडचणीत आणून परीक्षा घेणाऱ्या एमपीएससी परीक्षेचा नवा मुहूर्त आज, 12 मार्चला जाहीर करण्याचे वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर पाळले! परिणामी आतापर्यंत चारेक वेळा रद्द झालेली ही परीक्षा आता 21 मार्चला होणार आहे. 14 मार्चला होणारी ही परीक्षा ऐनवेळी स्थगित …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राज्यातील आघाडी सरकारचे वाभाडे काढणाऱ्या व सरकारला अडचणीत आणून परीक्षा घेणाऱ्या एमपीएससी परीक्षेचा नवा मुहूर्त आज, 12 मार्चला जाहीर करण्याचे वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर पाळले! परिणामी आतापर्यंत चारेक वेळा रद्द झालेली ही परीक्षा आता  21 मार्चला होणार आहे.

14 मार्चला होणारी ही परीक्षा ऐनवेळी स्थगित करण्यात आली. यामुळे राज्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली. पुणे येथे उमेदवारांचे उत्‍स्फुर्त आंदोलन पेटले! बुलडाण्यात जिल्हा कचेरीसमोर निदर्शने करण्यात आली. यानंतर रात्री उशिरा दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करीत नवीन तारीख कोणत्याही परिस्थितीत शुक्रवारी जाहीर करण्याचे वचन दिले, हे वचन पळून त्यांनी आपला शब्द खरा ठरवत हजारो उमेदवारांना दिलासा दिला. आता 21 मार्चला ही परीक्षा पडणार आहे. आपल्या जिल्ह्यापुरते सांगायचे झाल्यास 3912 जणांनी नोंदणी केली आहे. बुलडाणा शहर परिसरातील 13 केंद्रांवरून परीक्षा पार पडणार आहे. यासाठी केंद्र प्रमुख, केंद्र लिपिक, समवेक्षक, पर्यवेक्षक, समन्वय अधिकारी व शिपाई मिळून 300 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, 27 मार्च रोजो आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा ठरल्याप्रमाणे पार पडणार आहे. तसेच 11 एप्रिलला आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त परीक्षा देखील त्याच तारखेला पार पडणार, असे एमपीएससी कडून स्पष्ट करण्यात आले.