दिव्यांगांना घरपोच लसीकरणाची सुविधा उपलब्‍ध करा; नगरसेवक नामु गुरुदासानी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर सध्या 45 वर्षे वयोगटावरील दुर्धर आजारग्रस्त नागरिक व 60 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र 100 टक्के दिव्यांग नागरिक आणि बेडवरून उठू न शकणारे नागरिक लसीकरण केंद्रापर्यंत सहज पोहचू शकत नाही. अशा दिव्यांगासाठी घरपोच लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर सध्या 45 वर्षे वयोगटावरील दुर्धर आजारग्रस्त नागरिक व 60 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र 100 टक्के दिव्यांग नागरिक आणि बेडवरून उठू न शकणारे नागरिक लसीकरण केंद्रापर्यंत सहज पोहचू शकत नाही. अशा दिव्यांगासाठी घरपोच लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी मागणी चिखलीचे नगरसेवक नामु गुरुदासानी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रति पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार श्वेताताई महाले पाटील, जिल्हा शल्यचिकिसक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना  देण्यात आल्‍या आहेत.