दिव्यांग बांधवांसाठी जयपूर फूट शिबिर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः समाधा आश्रम, नागपूर यांच्यामार्फत पूज्य समाधा आश्रम, बँक कॉलनी, जरीपटका, नागपूर येथे 17, 18 व 19 सप्टेंबर 2021 रोजी जयपूर फूट, कृत्रिम अंग वितरण नि:शुल्क शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी कृत्रिम अवयव व साधने पुरविण्याबाबत मोजमाप करण्यात येणार आहे. शिबिरात 17 व 18 सप्टेंबर रोजी सकाळी 9 …
 
दिव्यांग बांधवांसाठी जयपूर फूट शिबिर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः समाधा आश्रम, नागपूर यांच्‍यामार्फत पूज्‍य समाधा आश्रम, बँक कॉलनी, जरीपटका, नागपूर येथे 17, 18 व 19 सप्टेंबर 2021 रोजी जयपूर फूट, कृत्रिम अंग वितरण नि:शुल्क शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी कृत्रिम अवयव व साधने पुरविण्याबाबत मोजमाप करण्यात येणार आहे. शिबिरात 17 व 18 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत जयपूर येथील तज्‍ज्ञांमार्फत रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. 19 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कृत्रिम अंगाचे ट्रायल घेणे, समाधान करण्यात येणार आहे. तसेच कृत्रिम अंग वितरण कार्यक्रम सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत होणार आहे. दिव्यांग व्यक्तींना त्यांचे अपंगत्वानुसार आवश्यक लागणाऱ्या साहित्याचे मोजमाप करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.