बँकेतून काढलेले 50 हजार रुपये हिसकावून दोघांचा पळ; मोताळा तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 62 वर्षीय वृद्धाच्या हातून 50 हजार रुपयांची पिशवी हिसकावून दुचाकीवरील दोघांनी पळ काढल्याची घटना काल, 19 एप्रिलच्या दुपारी 4 च्या सुमारास मोताळा येथील स्टेट बँकेजवळ घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. परडा (ता. मोताळा) येथील रमेश आत्माराम शिंबरे मोताळा येथे स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  62 वर्षीय वृद्धाच्या हातून 50 हजार रुपयांची पिशवी हिसकावून दुचाकीवरील दोघांनी पळ काढल्याची घटना काल, 19 एप्रिलच्‍या दुपारी 4 च्‍या सुमारास मोताळा येथील स्टेट बँकेजवळ घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

परडा (ता. मोताळा)  येथील रमेश आत्माराम शिंबरे मोताळा येथे स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. बँकेतून त्यांनी दीड लाख रुपये काढले. त्यातील 1 लाख रुपयांच्‍या 2 हजार रुपयांच्या पन्‍नास नोटा त्यांनी पायजाम्याच्या खिशात ठेवल्या तर उर्वरित 50 हजार रुपये त्यांनी त्यांच्याजवळच्या पिशवीत ठेवले होते. झेरॉक्स काढण्यासाठी रस्ता ओलांडत असताना मागून आलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी त्यांच्याजवळील पिशवी हिसकाली व 50 हजार रुपये घेऊन मोताळा बस स्टँडच्या दिशेने पळून गेले, अशी तक्रार रमेश शिंबरे यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुचाकीस्वारांचा शोध घेतला जात आहे.