दीड वर्षापासून झोप उडवली होती.. अखेर “व्हायरस’ गजाआड!; खामगावच्या खामगाव शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या दीड वर्षापासून खामगाव परिसरातील नागरिकांना त्रस्त करून सोडणाऱ्या “व्हायरस’च्या मुसक्या आवळण्यात अखेर खामगावच्या शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. काल, १६ ऑक्टोबरला अटक केलेला हा “व्हायरस’ म्हणजे अट्टल मोटारसायकलचोर अंकुश उर्फ व्हायरस गणेश देशमुख (३०, रा. रावणटेकडी, खामगाव) आहे. “व्हायरस’ने मोटारसायकलवर नजर टाकली म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ती गायब …
 
दीड वर्षापासून झोप उडवली होती.. अखेर “व्हायरस’ गजाआड!; खामगावच्या खामगाव शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या दीड वर्षापासून खामगाव परिसरातील नागरिकांना त्रस्त करून सोडणाऱ्या “व्हायरस’च्‍या मुसक्‍या आवळण्यात अखेर खामगावच्या शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. काल, १६ ऑक्टोबरला अटक केलेला हा “व्हायरस’ म्हणजे अट्टल मोटारसायकलचोर अंकुश उर्फ व्हायरस गणेश देशमुख (३०, रा. रावणटेकडी, खामगाव) आहे.

“व्हायरस’ने मोटारसायकलवर नजर टाकली म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ती गायब झालीच म्हणून समजा.. अशी त्‍याची ख्याती होती. कंझारा (ता. खामगाव) येथील रफिक खान रियाजउल्ला खान यांची (एमएच २८ डब्ल्यू ८७७०) मोटारसायकल ९ ऑक्टोबर रोजी मस्तान चौक भागातून चोरीला गेली होती. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी तपासाला वेग दिला, तेव्‍हा याप्रकरणात सुद्धा अट्टल चोरटा व्हायरसचा हात असल्याचे खबऱ्यांकडून कळले.

पोलिसांनी व्हायरसला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीस खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून २ चोरीच्या दुचाकीसुद्धा जप्त करण्यात आला. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, खामगावच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अरुण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक रवींद्र लांडे, पोहेकाँ देवेंद्र शेळके, संदीप टाकसाळ, सागर भगत, अरविंद बडगे, सुरज राठोड, रवींद्र कन्‍नर यांनी केली.