दीड हजारावर पोलिसांचा जिल्ह्यात तगडा बंदोबस्‍त!; बाप्पाचे स्वागत उत्‍साहात, पण नियम पाळून!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचे आज, १० सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात आगमन होत आहे. कोरोनाचे सावट असले तरी नियम पाळून परंपरा जपली जात आहे. जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दोन अप्पर पोलीस अधीक्षक, ७ उपविभागीय पोलीस अधिकारी, ३० पोलीस निरीक्षक, ५६ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १२० पोलीस उपनिरीक्षक, १ एसआरपी …
 
दीड हजारावर पोलिसांचा जिल्ह्यात तगडा बंदोबस्‍त!; बाप्पाचे स्वागत उत्‍साहात, पण नियम पाळून!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचे आज, १० सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात आगमन होत आहे. कोरोनाचे सावट असले तरी नियम पाळून परंपरा जपली जात आहे. जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दोन अप्पर पोलीस अधीक्षक, ७ उपविभागीय पोलीस अधिकारी, ३० पोलीस निरीक्षक, ५६ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १२० पोलीस उपनिरीक्षक, १ एसआरपी कंपनी, ९०० पुरुष होमगार्ड, १०० महिला होमगार्ड, ३ आरसीपी तुकड्या असा बंदोबस्त जिल्हाभर लावण्यात आला आहे.

गणेशोत्सवापूर्वीच कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी जिल्ह्यातील सातही उपविभागांत शांतता समितीच्या बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांसह गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत श्री. चावरिया यांनी संवाद साधला. उत्सव शांततेत व नियमांचे पालन करून साजरा करण्याचे आवाहन केले. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मात्र उत्साहात गणरायाचे आगमन होत आहे. यावर्षी २३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यात आली असून, त्यांना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.