दुःखद ब्रेकिंग! तहसीलमधील कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू? पथकानेच केले अंत्यसंस्कार!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा जबर फटका बसलेल्या बुलडाणा तहसील कार्यालयातील एका कर्मचार्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्यावर बुलडाणा तालुक्यातील राहत्या गावी (माळवंडी) येथे पथकाद्वारे अंत्यसंस्कार करण्यात आले.यापूर्वी तहसीलमधील 21 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. हे सर्व जण उपचारानंतर निगेटिव्ह होऊन कामावर रुजू झाले. यादरम्यान इतरांनी चाचण्या करून घेतल्या. मात्र …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा जबर फटका बसलेल्या बुलडाणा तहसील कार्यालयातील एका कर्मचार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्यावर बुलडाणा तालुक्यातील राहत्या गावी (माळवंडी) येथे पथकाद्वारे अंत्यसंस्कार करण्यात आले.
यापूर्वी तहसीलमधील 21 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. हे सर्व जण उपचारानंतर निगेटिव्ह होऊन कामावर रुजू झाले. यादरम्यान इतरांनी चाचण्या करून घेतल्या. मात्र मृतक कोतवाल संवर्गीय कर्मचार्‍याने शेवटपर्यंत चाचणी करून घेण्याचे टाळले. नुकतेच ते कुटुंबासह नागपूरला एक समारंभासाठी गेले होते. त्यावेळी ते बाधित झाल्याचा संशय आहे. तेथून परतल्यावरही त्यांनी घरीच उपचार घेतले. मंगळवारी प्रकृती अतिगंभीर झाल्यावर त्यांना बुलडाणा येथील कोविड रुग्णालयात भरती करण्यात आल्यावर त्यांचे तात्काळ निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी माळवंडी येथेच कर्मचार्‍यांच्या पथकाने अंत्यसंस्कार केल्याचे सूत्रांनी सांगितले.