दुकान फोडले पण सीसीटीव्‍हीमुळे अडकले; अवघ्या काही तासांतच चोरटे जेरबंद, खामगाव शहर पोलिसांनी कामगिरी

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव शहरातील टिळक पुतळा परिसरातील पगारिया इलेक्ट्रिकल दुकान फोडून डीव्हीआर (किंमत ८ हजार रुपये) व रोख ५ हजार असा एकूण १३ हजारांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या दोघांना खामगाव शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने १० जुलैला अटक केली आहे. ९ जुलैला चोरी झाली होती. अवघ्या काही तासांतच चोरट्यांच्या मुसक्या …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खामगाव शहरातील टिळक पुतळा परिसरातील पगारिया इलेक्‍ट्रिकल दुकान फोडून डीव्‍हीआर (किंमत ८ हजार रुपये) व रोख ५ हजार असा एकूण १३ हजारांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या दोघांना खामगाव शहर पोलीस ठाण्याच्‍या डीबी पथकाने १० जुलैला अटक केली आहे. ९ जुलैला चोरी झाली होती. अवघ्या काही तासांतच चोरट्यांच्‍या मुसक्‍या आवळल्‍याने पोलिसांचे कौतुक होत आहे.

चोरी प्रकरणी योगेश कांतीलाल पगारिया यांच्‍या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल करत तपास सुरू केला होता. दुकानातील सीसीटीव्‍हीत चोरटे दिसून आले होते. ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली गुन्‍हे शोध पथकाचे प्रमुख गौरव सराग, पोहेकाँ गजानन बोरसे, नापोकाँ सुरज राठोड, पोकाँ दीपक राठोड, जितेश हिवाळे, अमरदीपसिंह ठाकूर यांनी तपासाला गती देत गुप्‍त माहितीच्‍या आधारे गवळीपुरा व शौकत कॉलनीतील दोघांना सापळा रचून उचलले. दोघांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्‍या दाखवताच त्‍यांनी चोरीची कबुली दिली. त्‍यांच्‍याकडून रोख रक्‍कम व डीव्‍हीआर जप्‍त करण्यात आला आहे. शेख आसीफ शेख अब्बास (रा. गवळीपुरा) व शेख शरीफ शेख हारुण (रा. शौकत कॉलनी) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.