दुकान बंद करण्यावरून व्‍यापारी अन्‌ पोलिसांत बाचाबाची; दुकान बंद करणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मानणार नाही म्‍हटल्‍यावरून वाद!

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विकेंड लॉकडाऊननंतर शहरातील बाजारात काल, 12 एप्रिलला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. कोरोना रोखण्याकरिता आवश्यक असणाऱ्या त्रिसूत्रीचा अवलंब नागरिक करताना दिसले नाहीत. विना मास्क व सुरक्षित अंतराचे पालन करतानाही दिसत नव्हते. त्यामुळे नांदुरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांच्या पथकाने गस्त घालून दुकानदारांना दुकाने बंद करण्यास …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः विकेंड लॉकडाऊननंतर शहरातील बाजारात काल, 12 एप्रिलला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. कोरोना रोखण्याकरिता आवश्यक असणाऱ्या त्रिसूत्रीचा अवलंब नागरिक करताना दिसले नाहीत. विना मास्‍क व सुरक्षित अंतराचे पालन करतानाही दिसत नव्हते. त्‍यामुळे नांदुरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांच्या पथकाने गस्त घालून दुकानदारांना दुकाने बंद करण्यास सांगितले एका व्यापाऱ्याने आदेश धुडकावला. त्‍यामुळे त्‍यांच्याविरुद्ध साथरोग प्रतिबंधक अधिनियम आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.

पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये तहसीलदार राहुल तायडे, न. प. मुख्याधिकारी आशिष बोबडे, ठाणेदार सुरेश नाईकनवरे व कर्मचारी शहरात लॉकडाऊनच्या संबंधाने पायी पेट्रोलिंग करत असताना जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून आकाश कलेक्शन नावाचे कापड दुकान उघडे दिसले. त्‍यांना दुकान बंद करणेबाबत हटकले असता मी दुकान बंद करणार नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मानत नाही, असे दुकानमालकाने म्हणत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. यावरून पोलीस कर्मचारी कैलास मोतिसिंग सुरडकर (35) यांच्या फिर्यादीवरून दुकानमालक शैलेश अशोक नावांनी (32, रा. संकल्प कॉलनी, नांदुरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी सहायक पोलीस निरिक्षक श्री. गाडेकर, पोलीस उपनिरिक्षक श्री. दोंड, श्री. घोडेस्वार, पो.काँ. सुरडकर, पो.काँ.अरुण कुटाफळे, पो. काँ. आघाव, अतुल मोहोळ, पो.काँ. बोर्डे व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.