दुचाकींच्‍या धडकेत आई-मुलगा जखमी; मेहकर तालुक्‍यातील घटना

मेहकर (विष्णू आखरे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन तीन जण जखमी झाले. ही घटना आज, १५ फेब्रुवारीच्या सकाळी दहाच्या सुमारास नागपूर-मुंबई महामार्गावरील नागापूर (ता. मेहकर) येथील वळणावर घडली.डोणगाव येथील सुनील परमाळे दुचाकीने (क्र. एमएच 28 बीजे 4609) मेहकरवरून डोणगाव येथे येत होते, तर शिरपूरवरून मेहकरच्या दिशेने पवन सोळंकी व …
 

मेहकर (विष्णू आखरे पाटील ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन तीन जण जखमी झाले. ही घटना आज, १५ फेब्रुवारीच्या सकाळी दहाच्या सुमारास नागपूर-मुंबई महामार्गावरील नागापूर (ता. मेहकर) येथील वळणावर घडली.
डोणगाव येथील सुनील परमाळे दुचाकीने (क्र. एमएच 28 बीजे 4609) मेहकरवरून डोणगाव येथे येत होते, तर शिरपूरवरून मेहकरच्या दिशेने पवन सोळंकी व त्यांची आई दुचाकीने (क्र. एमएच 28 एएच 9471) जात होते. दोन्‍ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात तिघेही जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलीस स्टेशनचे विकास राऊत, अशोक नरोटे, श्री. अंभोरे यांच्‍यासह कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. जखमींना प्राथमिक आरोग्य डोणगाव येथे नेण्यात आले. पुढील उपचारासाठी मेहकर येथे हलविण्यात आले आहे. तपास डोणगाव पोलीस स्टेशन करीत आहेत.