दुचाकीचोरीची तक्रार दाखल होताच अवघ्या काही तासांत चोरटे गजाआड!; बुलडाणा शहर पोलिसांची कामगिरी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा बसस्थानक परिसरातून पल्सर दुचाकी भरदुपारी चोरीला गेली होती. पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले विक्रांत गुळवे यांनी आज, 1 एप्रिल रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रार दिल्यानंतर अवघ्या काही तासांत चोरट्यांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. अक्षय सपकाळ (22, रा. जांभरून रोड, बुलडाणा), मंगेश लुक्कड (27, रा. क्रीडा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा बसस्थानक परिसरातून पल्सर दुचाकी भरदुपारी चोरीला गेली होती. पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले विक्रांत  गुळवे यांनी आज, 1 एप्रिल रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रार दिल्यानंतर अवघ्या काही तासांत चोरट्यांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. अक्षय सपकाळ (22, रा. जांभरून रोड, बुलडाणा), मंगेश लुक्कड (27, रा. क्रीडा संकुलाजवळ बुलडाणा), संतोष झिने (20, रा. जांभरून रोड, बुलडाणा), सुनील विनोद पळस्कर (20) अशी अटक केलेल्या दुचाकी  चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

25  मार्च रोजी दुपारी 2 वाजता विक्रांत गुळवे यांचे चुलत भाऊ विशाल सुभाष गुळवे (रा. पळसखेड, ता. चिखली) यांनी त्यांच्याकडील विना क्रमांकाची पल्सर दुचाकी बस स्टँडवरील रसवंतीच्या बाजूला ठेवली  होती. गाडीची चावी विक्रांत गुळवे यांच्‍याकडे दिली होती. संध्याकाळी 7 वाजता विक्रांत गुळवे दुचाकी आणण्यासाठी गेले असता त्यांना गाडी तिथे दिसली नाही. शोधाशोध करूनही दुचाकी न सापडल्याने त्यांनी आज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच चोरट्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई बुलडाणा शहर पोलीस ठाण्याचे एएसआय विनोद शिंदे ,पोहेकाँ माधव पेटकर, पोकाँ प्रशांत मोरे यांनी केली.