दुचाकीधारकांनो अलर्ट व्‍हा!; जिल्ह्यात वाढल्या दुचाकी चोरीच्या घटना, तुम्‍ही तुमची दुचाकी सुरक्षित ठेवा!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. आणखी चार मोटारसायकली चोरी गेल्याच्या तक्रारी ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्यांत दाखल झाल्या आहेत. त्यावरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळमेश्वर (ता. मेहकर) येथील वैभव रामेश्वर निकम (१९) याने १० जुलै रोजी त्याची मोटारसायकल (MH-28AW-4312) गोठ्यात ठेवली होती. दुसऱ्या दिवशी ११ जुलैला सकाळी …
 
दुचाकीधारकांनो अलर्ट व्‍हा!; जिल्ह्यात वाढल्या दुचाकी चोरीच्या घटना, तुम्‍ही तुमची दुचाकी सुरक्षित ठेवा!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. आणखी चार मोटारसायकली चोरी गेल्याच्या तक्रारी ठिकठिकाणच्‍या पोलीस ठाण्यांत दाखल झाल्या आहेत. त्‍यावरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • कळमेश्वर (ता. मेहकर) येथील वैभव रामेश्वर निकम (१९) याने १० जुलै रोजी त्‍याची मोटारसायकल (MH-28AW-4312) गोठ्यात ठेवली होती. दुसऱ्या दिवशी ११ जुलैला सकाळी ती गायब झाल्याचे दिसले. याप्रकरणी बराच शोध घेतल्यानंतर त्‍याने २२ जुलैला जानेफळ पोलीस ठाण्यात तक्रार केली. तपास सहायक फौजदार गणेश डव्हळे करत आहेत.
  • मेहकर शहरातील रामनगर येथील अशोक रामभाऊ मंजूळकर (४७) यांची मोटारसायकल (क्र. MH-28-BE-5923) २१ जुलै रोजी खंडाळा बायपासवरून चोरट्याने चोरून नेली. त्यांनी बराच शोध घेतला मात्र मोटारसायकल मिळून आली नाही. त्‍यामुळे त्‍यांनी २२ जुलैला मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
  • ज्ञानेश्वर गजानन सांगोकर (३५, रा. सांगवी जोमदेव ता. बाळापूर जि. अकोला) यांचा लहान भाऊ अतुल हा शेगावला एमबीएचे शिक्षण घेतो. सध्या कोविडमुळे ऑनलाइन क्लास सुरू असल्याने तो गावकडेच राहत होता. २० जुलैला अतुलचा एमबीएचा निकाल असल्याने तो शेगावला मोटारसायकलने (MH 30 AR 5977) आला होता. मुक्काम करायचा असल्याने त्याने त्याची मोटारसायकल गुरुकृपा अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये ठेवली व मित्राच्या रूमवर झोपायला गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मोटारसायकल त्याला दिसली नाही. शोध घेऊनही मिळून न आल्याने २१ जुलैला शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
  • अशोक उखा राठोड (३३, रा. सर्वेश्वरनगर मोताळा) यांची मोटारसायकल (MH 28 AM 4012) ही १८ जुलै रोजी घरासमोर उभी केली होती. सायंकाळी साडेसहा वाजता मोटारसायकल घरासमोर उभी करून ते बाहेर गेले २० मिनिटांनंतर परत आले असता मोटारसायकल दिसली नाही. शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने त्यांनी २० जुलै रोजी बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.