दुचाकीला अपघात, दोघे गंभीर; जळगाव जामोद येथील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. ही घटना काल, ३ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्राजवळ घडली. गजानन सनान्से (३०) व नंदू हरमकार(३४, दोघेही रा. निभोरा, ता. जळगाव जामोद) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. दोघे दुचाकीस्वार रात्री निभोरा येथे जात असताना त्यांच्या …
 
दुचाकीला अपघात, दोघे गंभीर; जळगाव जामोद येथील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. ही घटना काल, ३ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्राजवळ घडली.

गजानन सनान्‍से (३०) व नंदू हरमकार(३४, दोघेही रा. निभोरा, ता. जळगाव जामोद) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. दोघे दुचाकीस्वार रात्री निभोरा येथे जात असताना त्यांच्या मोटारसायकलला (क्र. एमएच २८ एएफ ४७७९) अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघातानंतर धडक देणारे वाहन पसार झाले. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी दोघे गंभीर जखमी अवस्थेत दिसल्यानंतर त्यांना लगेच जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांनी खामगाव येथे हलविण्यात आले आहे.